Mumbai MHADA Lottery: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या १२० फ्लॅट्ससाठी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'; ताडदेव ते कांदिवलीपर्यंत संधी!

Published : Feb 03, 2026, 07:42 PM IST

Mumbai MHADA Lottery : म्हाडाने मुंबईतील विविध ठिकाणी १२० फ्लॅट्ससाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही योजना जाहीर केली. या योजनेत ३८ लाखांपासून ते ८ कोटींपर्यंतच्या घरांचा समावेश असून अर्ज प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ पासून ऑनलाइन सुरू होत आहे. 

PREV
15
मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या १२० फ्लॅट्ससाठी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य'

मुंबई : स्वप्नांच्या नगरीत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने (MHADA) एक सुवर्णसंधी आणली आहे. मुंबईतील विविध मोक्याच्या ठिकाणच्या १२० फ्लॅट्ससाठी म्हाडाने 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come First Served) ही योजना जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये सामान्य मध्यमवर्गीयांपासून ते उच्चभ्रूंसाठी ३८ लाखांपासून ८ कोटींपर्यंतचे घरांचे पर्याय उपलब्ध आहेत. 

25
कुठे आहेत ही घरे?

हे फ्लॅट्स अशा ठिकाणचे आहेत ज्यांची लॉटरी पूर्वी निघाली होती, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांची विक्री होऊ शकली नव्हती. आता म्हाडाने हे फ्लॅट्स पुन्हा विक्रीसाठी काढले आहेत.

परिसर: ताडदेव, जुहू, अंधेरी, पवई, वडाळा, कांदिवली आणि चारकोप.

किंमत: सर्वात स्वस्त घर ३८ लाख रुपयांपासून सुरू होते, तर दक्षिण मुंबईतील ताडदेव येथील आलिशान घराची किंमत ८ कोटी रुपयांहून अधिक आहे. 

35
अर्जाची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

या योजनेसाठी तुम्हाला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

नोंदणी सुरू: ५ फेब्रुवारी २०२६, गुरुवारपासून.

पेमेंट सुविधा: सुरक्षा ठेव (Deposit) आणि अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया १२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.

निवड प्रक्रिया: वेबसाईटवर घराची निवड केल्यानंतर पुढील ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या १०% रक्कम जमा करणे अनिवार्य आहे.

सावधान! जर तुम्ही १०% रक्कम ४८ तासांत भरली नाही, तर तुमचा दावा रद्द होईल आणि तुमची सुरक्षा ठेव (Deposit) जप्त केली जाईल. 

45
नियम आणि अटी काय आहेत?

रद्द केल्यास दंड: जर तुम्हाला 'तात्पुरते ऑफर लेटर' मिळाल्यानंतर घर रद्द करायचे असेल, तर घराच्या एकूण किमतीच्या १% रक्कम दंड म्हणून कापली जाईल.

होम लोन सुविधा: गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांनी बँकेचे 'प्री-अप्रूव्हल लेटर' लॉगिन आयडीवर अपलोड करणे आवश्यक आहे, त्यानंतर म्हाडा बँकेला 'NOC' जारी करेल. 

55
ताबा कधी मिळणार?

घराची संपूर्ण किंमत आणि मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरल्यानंतर म्हाडाकडून ताबा पत्र (Possession Letter) दिले जाईल.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories