मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो लाईन 2बीचे काम अंतिम टप्प्यात; ‘या’ स्थानकांवरून धावणार यलो लाईन

Published : Feb 11, 2026, 04:30 PM IST

Mumbai Metro Line 2B Updates: मुंबईतील मेट्रो लाईन 2बी (यलो लाईन) चे काम वेगाने पूर्ण होत असून, ही मार्गिका पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणार आहे. डीएन नगर ते मंडाले हा 23.64 किमीचा कॉरिडॉर शहरातील वाहतूक कोंडी कमी करेल.

PREV
15
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई : मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक अपडेट समोर आले आहे. शहरात सुरू असलेल्या महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांपैकी एक असलेल्या मेट्रो लाईन 2बी (यलो लाईन) चे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असून लवकरच नागरिकांना या नव्या मार्गिकेचा लाभ घेता येणार आहे. पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारी ही लाईन शहरातील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय ठरणार आहे. 

25
सायन-पनवेल महामार्गावरील ट्रॅफिकला पर्याय

पूर्व मुंबईतील नागरिकांना सायन–पनवेल महामार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः ऑफिसच्या गर्दीच्या वेळेत प्रवास अधिक त्रासदायक ठरतो. या पार्श्वभूमीवर मेट्रो लाईन 2बी हा मोठा पर्याय म्हणून पुढे येत आहे. ही मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करणार आहे. 

35
डीएन नगर ते मंडाले 23.64 किमीचा महत्त्वाचा कॉरिडॉर

अंधेरी पश्चिमेतील डीएन नगरपासून मानखुर्द पूर्वेतील मंडालेपर्यंत धावणारी ही 23.64 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन शहरातील प्रवासाचे चित्र बदलणार आहे. या मार्गावरील एक प्रमुख स्थानक एप्रिल 2026 मध्ये प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश करण्यात आला असून स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

45
या असतील यलो लाईनवरील स्थानके

मेट्रो लाईन 2बी अंतर्गत पुढील स्थानके प्रस्तावित आहेत.

ईएसआयसी नगर

प्रेम नगर

इंदिरा नगर

नानावटी हॉस्पिटल

खेरानगर

सारस्वत नगर

नॅशनल कॉलेज

वांद्रे

आयकर विभाग कार्यालय

आयएलएफएस

एमटीएनएल

बर्वे मार्ग

कुर्ला पूर्व

पूर्व द्रुतगती मार्ग

चेंबूर

डायमंड गार्डन

शिवाजी चौक

बीएसएनएल

मानखुर्द

मंडाले

या स्थानकांमुळे अनेक महत्त्वाचे व्यापारी आणि निवासी भाग मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार आहेत. 

55
संपूर्ण मार्गिका कधी सुरू होणार?

सध्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर असून सुरक्षा प्रमाणपत्र प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण मार्ग 2026 ते 2027 दरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही लाईन मेट्रो 1, 2 आणि 3 शी जोडली जाणार आहे. तसेच लोकल ट्रेन आणि मोनोरेलशीही उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मेट्रो लाईन 2बी महत्त्वाची भर घालणार असून शहरातील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories