Mumbai Mega Block : रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा वेळापत्रक

Mumbai Mega Block Update : प्रत्येक रविवारी मध्य, पश्चिम मार्गावर ब्लॉक घेतला जातो. मेगाब्लॉकवेळी लोकलची संख्या कमी असण्यासह काही ट्रेनच्या मार्गात बदल केला जातो. अशातच रविवारी (21 एप्रिल) घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा.

Chanda Mandavkar | Published : Apr 20, 2024 5:02 AM IST / Updated: Apr 20 2024, 10:52 AM IST

Mumbai Mega Block Time Table : पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (21 एप्रिल) रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंगसह अन्य काही कामांमुळे जम्बो ब्लॉक (Jumbo Block) असणार आहे. यावेळी बोरिवली (Borivali) आणि गोरेगाव (Goregaon) स्थानकादरम्यान सकाळी 10.00 वाजल्यापासून ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत डाउन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे.

ब्लॉकवेळी अप आणि डाउन मार्गावर सर्व धिम्या मार्गावरील ट्रेन बोरिवली आणि गोरेगावदरम्यानच्या सर्व अप आणि डाउन लोकल फास्ट मार्गावर चालवल्या जाणार आहेत. याशिवाय ब्लॉकवेळी काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावरुन गोरेगावपर्यंत लोकल धावणार
पश्चिम रेल्वेच्या जम्बो ब्लॉकवेळी अंधेरी आणि बोरिवली ट्रेन हार्बर मार्गावरुन गोरेगावपर्यंत चालवल्या जाणार आहेत. याशिवाय बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 01,02,03 आणि 04 वरुन लोकल धावणार नाहीत. (Western Railway Margavar Jumbo block)

मध्य रेल्वे मार्गावरील वेळापत्रक
शुक्रवार/शनिवार 19 आणि 20 एप्रिल रात्री आणि शनिवारी/रविवारी 20 आणि 21 एप्रिलला सीएसएमटी (CSMT) प्लॅटफॉर्मच्या एक्सेंटशन कार्यासाठी दोन तासांचा विशेष पॉवर ब्लॉक 21 एप्रिलला सकाळी असणार आहे. यामुळे मुख्य मार्गिकेवर सीएमएमटी-कल्याण आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-पनवेल हार्बर लाइनदरम्यान कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

आणखी वाचा : 

Maharashtra : राज्यात अवकाळी पावसासह उष्माघाताची स्थिती पुढील काही दिवस राहणार, जाणून घ्या मुंबईतील तापमानाची स्थिती

Mumbai Heatwave: मुंबईत मोडला 14 वर्षांचा रेकॉर्ड, एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा 39.7 सेल्सिअच्या पार

Share this article