Mumbai Madgaon Special Train: एप्रिल महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन १० ते १४ एप्रिल दरम्यान धावणार आहे.
मुंबई: एप्रिल महिन्यातील सलग सुट्ट्यांचा मोठा 'विकेंड' लक्षात घेता, पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव स्पेशल एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि विकेंडमुळे सलग चार दिवस सुट्ट्यांची पर्वणी असल्याने, प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.
26
वेळापत्रक आणि प्रवासाचा तपशील
ही विशेष ट्रेन १० एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान धावणार आहे. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
ट्रेन क्र. ०११२९ (डाऊन): मुंबई सीएसएमटी स्थानकावरून दररोज मध्यरात्री १२:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ०३:१५ वाजता मडगावला पोहोचेल.
ट्रेन क्र. ०११३० (अप): मडगाव स्थानकावरून दररोज संध्याकाळी ०४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
36
या महत्त्वाच्या स्थानकांवर घेणार थांबा
कोकण पट्ट्यातून प्रवास करणाऱ्यांना या ट्रेनचा मोठा फायदा होईल. ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या प्रमुख स्थानकांवर थांबेल.
प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या ट्रेनमध्ये एकूण २२ डबे असतील.
१८ एसी थ्री-टियर कोच (AC 3 Tier)
२ स्लीपर क्लास कोच
२ एलएचबी (LHB) कोच
56
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
सुट्ट्यांच्या दिवसात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे ऐनवेळी तिकीट मिळवण्यात होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट किंवा खिडकीवरून आगाऊ बुकिंग (Advance Booking) करावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
66
फायदा कुणाला?
गोव्याच्या पर्यटनाचा प्लॅन करणाऱ्या तरुणांपासून ते गावच्या ओढीने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांपर्यंत सर्वांनाच या स्पेशल ट्रेनचा लाभ घेता येईल.