या नव्या ईएमयू (EMU) लोकल रेकमध्ये प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत.
स्वयंचलित बंद दरवाजे
दोन डब्यांमधील वेस्टिब्युल जोडणी
छतावर विशेष व्हेंटिलेशन युनिट
दरवाजांजवळ हवेच्या वहनासाठी झडपयुक्त खिडक्या
रेल्वेच्या मते, या सुविधा नॉन-एसी लोकल असूनही प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि तुलनेने आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील.