MHADA Homes : मुंबईकरांची मोठी चिंता मिटली! भाड्याने घर शोधण्याची कटकट आता इतिहासजमा; म्हाडाच्या या निर्णयामुळे लाखोंना दिलासा!

Published : Dec 15, 2025, 03:56 PM IST

MHADA Rental Homes 2025 : मुंबईतील वाढत्या घरभाड्याला पर्याय म्हणून म्हाडाने भाडेतत्त्वावर घरे देण्याचे धोरण आखले आहे. या योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू केले जाणार असून, विक्रीविना पडून असलेली हजारो घरे भाड्याने उपलब्ध करून दिली जातील. 

PREV
15
मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय!

MHADA Rental Homes 2025 : मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र गेल्या काही वर्षांत घरांच्या वाढलेल्या किमती आणि अवाजवी भाडेदरांमुळे सामान्य व मध्यमवर्गीयांसाठी हे स्वप्न अधिकच दूर गेलं आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणारा मोठा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला आहे. 

25
भाड्याच्या घरांचा नवा पर्याय

नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा उपचारांसाठी दररोज मुंबई व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मात्र परवडणाऱ्या भाड्याच्या घरांचा अभाव ही सर्वात मोठी समस्या ठरत होती. हीच बाब लक्षात घेऊन म्हाडाने भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यास सुरुवात केली आहे.

या नव्या धोरणानुसार, घर विक्रीसोबतच लवकरच म्हाडाकडून भाड्यानेही घरे देण्यात येणार आहेत. यामुळे खासगी भाडे बाजारातील जाचक अटी आणि प्रचंड भाडेदरांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

35
स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू होणार

राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली हे धोरण राबवण्यात येणार असून, भाड्याच्या घरांसाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना थेट म्हाडाची भाड्याची घरे अर्ज करून मिळू शकणार आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या भागात घर खरेदी करणे परवडत नसलेल्या नोकरदार, विद्यार्थी, स्थलांतरित आणि गरजू नागरिकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 

45
52 हजारांहून अधिक घरे पडून; भाड्याचा मार्ग खुला

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरात मोठ्या प्रमाणात घरे उभारण्यात आली आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळानेही या योजनेंतर्गत हजारो घरे बांधली आहेत. मात्र उत्पन्न मर्यादा, तसेच देशात अन्यत्र घर नसण्याच्या अटींमुळे सुमारे 52 हजारांहून अधिक घरे अद्याप विक्रीविना पडून आहेत.

हीच घरे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्यास, एकीकडे सामान्य नागरिकांना परवडणारी घरे मिळतील आणि दुसरीकडे पडून असलेल्या घरांचा योग्य वापरही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

55
मुंबईकरांसाठी नवा दिलासा

घर खरेदी परवडत नसलेल्या नागरिकांसाठी म्हाडाची भाड्याची घरे हा एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईतील भाडे बाजारात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories