Mumbai Local Mega Block : वीकेंडला लोकल प्रवाशांना मोठा फटका! पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Published : Mar 28, 2026, 09:04 AM IST
Mumbai Local Mega Block

सार

Mumbai Local Mega Block : वीकेंडला मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी अडचणी वाढणार आहेत. पश्चिम रेल्वेवर 20 तासांचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, तब्बल 299 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरही रविवारी ब्लॉक असल्याने प्रवाशांनी काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai Local Mega Block : मुंबईतील लोकल रेल्वे प्रवाशांसाठी या वीकेंडला प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पश्चिम रेल्वेने कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान पूल बांधकामासाठी तब्बल 20 तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे शेकडो लोकल गाड्या रद्द होणार असून, उर्वरित गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

कांदिवली–बोरिवलीदरम्यान मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेने पूल क्रमांक-61 च्या कामासाठी शनिवार, 28 मार्च रात्री 10.30 वाजल्यापासून ते रविवार, 29 मार्च सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत एकूण 299 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. उर्वरित गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. काही गाड्या अंधेरी ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून चालवण्यात येतील. राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर काही गाड्या थांबणार नाहीत.

मध्य रेल्वेवरही रविवारी ब्लॉक

मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंडदरम्यान रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक जाहीर केला आहे. या वेळेत धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी काही लोकल गाड्या सुमारे 20 मिनिटे उशिराने धावतील. रेल्वे रुळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर गाड्या रद्द

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे ते वाशी/नेरुळ आणि ठाणे ते पनवेल मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील. मात्र, सीएसएमटी ते वाशी आणि पनवेल तसेच खारकोपर–उरण मार्गावरील सेवा नियमित राहणार आहे.

प्रवाशांसाठी सूचना

या सर्व ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि रेल्वे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट