Mumbai Local : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मध्य, हार्बर मार्गावर १२ विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून, दादर स्थानकावरही प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त व्यवस्था केली.
Mumbai Local Train News: येत्या काही दिवसांत मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन काही लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. कोणत्या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
27
महापरिनिर्वाण दिनासाठी रेल्वे सज्ज, विशेष लोकलची मोठी व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता असल्यामुळे मध्य रेल्वेने विशेष तयारी करून अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
37
5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून विशेष लोकल सेवा
महत्वाचा बदल असा की 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर खालील दोन मार्गांवर एकूण 12 विशेष लोकल गाड्या धावतील.
परळ – कल्याण मार्ग
कुर्ला – वाशी – पनवेल मार्ग
या सर्व लोकल गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबणार असल्याने प्रवाशांना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, असा रेल्वेचा दावा आहे.