Mumbai Central Railway Night Block : मुंबईकरांनो, लोकलने प्रवास करताय? मध्य रेल्वेचा मोठा झटका; 'या' मार्गावरील गाड्या रद्द!

Published : Dec 17, 2025, 04:17 PM IST

Mumbai Central Railway Night Block : मध्य रेल्वे एल्फिन्स्टन रेल्वे पुलाचा जुना लोखंडी सांगाडा काढण्यासाठी 19 रात्रींचा ब्लॉक जाहीर करणारय. रात्री प्रत्येकी २ तासांच्या ब्लॉकमुळे लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यताय. 

PREV
16
मध्य रेल्वेचा मोठा नाईट ब्लॉक

मुंबई : रोज लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील एल्फिन्स्टन रेल्वे पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून, यासाठी मध्य रेल्वेकडून सलग 19 रात्रकालीन ब्लॉक जाहीर करण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

26
रात्री प्रत्येकी दोन तासांचे 19 ब्लॉक

एल्फिन्स्टन पुलावरील जुने लोखंडी गर्डर्स काढण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर प्रत्येकी दोन तासांचे एकूण 19 नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कालावधीत पुलाचा सांगाडा टप्प्याटप्प्याने कापून हटवला जाणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डासोबत चर्चा सुरू असून, अंतिम ब्लॉक वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

36
पश्चिम रेल्वेलाही बसणार फटका?

एल्फिन्स्टन पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वे मार्गावर येत असल्याने, तेथील लोखंडी संरचना हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेचाही ब्लॉक आवश्यक ठरणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात असून चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

46
वरळी-शिवडी उन्नत मार्गाचा मार्ग मोकळा

हा जुना एल्फिन्स्टन पूल पूर्णपणे हटवून त्या जागी वरळी-शिवडी उन्नत मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे, महारेल आणि अन्य प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक बैठका पार पडल्या आहेत.

56
लोकल प्रवाशांना किती त्रास होणार?

प्राथमिक टप्प्यात दोन तासांचे 19 नाईट ब्लॉक घेऊन पाडकाम सुरू करण्यावर एकमत झाले आहे. याशिवाय, अधिक कालावधीचा स्वतंत्र मेगाब्लॉक घेण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांच्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध ब्लॉकनुसार येत्या आठवड्यात सोमवारी किंवा मंगळवारी पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

66
ब्लॉकचा परिणाम लोकलसह इतर गाड्यांवरही होणार

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावर रात्री मोठ्या प्रमाणात मेल-एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक होत असल्याने या ब्लॉकचा परिणाम लोकलसह इतर गाड्यांवरही होऊ शकतो. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉकचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात येईल आणि अंतिम वेळापत्रक वेळेत जाहीर केले जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories