पश्चिम रेल्वेमार्गावर 36 तासांचा विशेष ब्लॉक, मुंबईकरांनो प्रवासापूर्वी वाचा वेळापत्रक

Published : May 31, 2025, 08:27 AM IST
mumbai local

सार

Mumbai Local Block : पश्चिम रेल्वेमार्गावर 36 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यासह काही लोकल उशिराने धावणार आहेत. यामुळे प्रवाशांनी आज आणि उद्या वेळात्रक पाहून घराबाहेर पडावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. 

Mumbai Local Block : मुंबईकर प्रवाशांसाठी शनिवार (३१ मे) आणि रविवार (१ जून) हे दोन दिवस रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. पश्चिम रेल्वेवर कांदिवली-बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ३६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम लोकलसह एक्स्प्रेस फेऱ्यांवर होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक

  • कांदिवली – बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम
  • कालावधी: शनिवार, ३१ मे दुपारी १ वाजता ते रविवार, १ जून मध्यरात्री १ वाजेपर्यंत 
  • रद्द फेऱ्या: 
    शनिवार – ७३ लोकल
    रविवार – ८९ लोकल 
  • एकूण रद्द फेऱ्या – १६२ काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार

कामाचा भाग: पाचव्या आणि यार्ड मार्गिकेवर काम सुरू असताना कांदिवली पश्चिमेकडील उन्नत तिकीट आरक्षण केंद्र पाडण्यात येणार आहे. त्यासाठी सात खिडक्यांचे पर्यायी केंद्र उघडण्यात आले आहे.

एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम

  • गाडी क्र. 19418 अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस – वसई रोडपर्यंत चालवली जाईल
  • गाडी क्र. 19417 बोरिवली-अहमदाबाद एक्स्प्रेस – वसईहून रवाना होईल
  • गाडी क्र. 19425 बोरिवली-नंदुरबार एक्स्प्रेस – भाईंदरहून रवाना होईल
  • गाडी क्र. 19426 नंदूरबार-बोरिवली एक्स्प्रेस – वसई रोडपर्यंत चालवण्यात येईल

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक –

  •  रविवार, १ जून  मध्य रेल्वे (सीएसएमटी – विद्याविहार)
  • वेळ: सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
  • अप आणि डाऊन धीम्या लोकल मार्गांवर परिणाम  
  • फेऱ्या अप व डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार तर घाटकोपरपासून पुन्हा धीम्या मार्गावर धावतील काही लोकल रद्द; काही २० मिनिटे विलंबाने धावणार

 हार्बर रेल्वे (सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे) 

  •  वेळ: सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० 
  • अप आणि डाऊन फेऱ्या रद्द 
  • सीएसएमटी/वडाळा – वाशी/पनवेल दरम्यान फेऱ्यांवर परिणाम तर पनवेल–कुर्ला (फलाट क्र. ८) विशेष लोकल फेऱ्या उपलब्ध

या काळात रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल झाल्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी ताजं वेळापत्रक नक्की तपासावं. विशेषतः लोकल प्रवासी आणि अहमदाबाद, नंदुरबार मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे.रेल्वे प्रशासनाकडून दिलासा देण्यासाठी काही विशेष फेऱ्या राबवण्यात येणार असल्या, तरी गर्दी, विलंब आणि रद्द फेऱ्यांची शक्यता लक्षात घेऊन प्रवास नियोजन करणं गरजेचं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा