Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'मेगा' गिफ्ट! मध्य रेल्वे 'या' ४ स्टेशन्सवर २० नवीन प्लॅटफॉर्म उभारणार!, तुमच्या स्टेशनवर काम कधी?

Published : Dec 02, 2025, 09:17 PM IST

Mumbai Local : मध्य रेल्वेने मुंबई, उपनगरातील परळ, कल्याण, LTT, पनवेल या 4 प्रमुख स्थानकांवर 20 नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार असून, प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल. 

PREV
16
चार प्रमुख स्थानकांवर उभारले जाणार 20 नवे प्लॅटफॉर्म

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील लाखो प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर तब्बल 20 नवीन प्लॅटफॉर्म्स उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकल प्रवासी तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांचाही प्रवास अधिक वेगवान, सुकर आणि सोयीस्कर होणार आहे.

26
20 नवीन प्लॅटफॉर्म कुठे उभारले जाणार?

मध्य रेल्वेनुसार, पुढील चार प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराची मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत.

परळ – 5 प्लॅटफॉर्म

कल्याण – 6 प्लॅटफॉर्म

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – 4 प्लॅटफॉर्म

पनवेल – 5 प्लॅटफॉर्म

एकूण: 20 नवे प्लॅटफॉर्म्स

ही सर्व स्थानके मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधील महत्वाची केंद्रे असल्यामुळे, या अतिरिक्त प्लॅटफॉर्म्समुळे लोकलसोबतच मेल-एक्सप्रेस गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येणार आहे. 

36
प्रवाशांसाठी का महत्त्वाचा निर्णय?

मुंबईच्या विस्तारणाऱ्या उपनगरांमुळे प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातच 15 डब्यांच्या लोकलसाठी स्टेशन्स विस्तारित करण्याचे काम आधीच सुरू आहे. आता 20 नवीन प्लॅटफॉर्म्समुळे

लांब पल्ल्याच्या गाड्यांची गर्दी कमी होईल

दादर आणि सीएसएमटीवरील ताण कमी होणार

लोकल फेऱ्या वाढविणे शक्य होईल

मुंबई–पनवेल–कोकण मार्गावरील रेल्वे ट्रॅफिक सुरळीत होईल 

46
परळ टर्मिनसचा मोठा बदल

रेल्वे अर्थसंकल्प 2025मध्ये परळला नव्या टर्मिनस म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव होता. आता त्या कामाला गती मिळाली आहे. नव्या मार्गांपैकी पाचवा आणि सहावा मार्ग फक्त मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी वापरला जाणार आहे. यामुळे दादर आणि सीएसएमटीवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. परळ स्टेशनची अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत पुनर्रचना सुरू असून, नवे प्लॅटफॉर्म मेल/एक्सप्रेस चालवण्यासाठी मोठा हातभार लावतील. 

56
पनवेलला मिळणार जबरदस्त बूस्ट

पनवेल हे पुढील काही वर्षांत नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स-हार्बर लिंक आणि मेट्रो नेटवर्कमुळे प्रचंड महत्त्वाचे परिवहन केंद्र होणार आहे.

या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये उभारले जाणारे 5 नवे प्लॅटफॉर्म

कोकणकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवतील

पनवेलला ‘मेगा इंटरचेंज हब’ बनवतील

मुंबई–नवी मुंबई–पुणे कनेक्टिव्हिटी अधिक गतिमान करतील 

66
LTT आणि कल्याण स्थानकांवरही मोठे अपडेट

LTT: उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांसाठी 4 नवे प्लॅटफॉर्म

कल्याण: 6 प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेस दोन्हींच्या गाड्या वाढणार

मध्य रेल्वेचा हा निर्णय मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी गेम-चेंजर ठरणार आहे. येत्या काही वर्षांत मुंबई रेल्वे नेटवर्क अधिक आधुनिक, विस्तारित आणि सक्षम होणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories