मुंबईवर पाणीसंकटाचे सावट, जुलैअखेर पुरेल का साठा?

Published : May 18, 2025, 07:25 AM IST
Water Cut in Mumbai

सार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सध्याच्या साठ्यावर अवलंबून राहिल्यास जुलै अखेरपर्यंतच पुरवठा शक्य आहे.

मुंबई: मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पाण्याच्या संकटाची छाया घोंगावत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सध्याच्या साठ्यावर अवलंबून राहिल्यास जुलै अखेरपर्यंतच पुरवठा शक्य आहे.

मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या तलावांमधून रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवले जाते. मात्र, वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातच, प्रमुख चार तलावांतील पाण्याची पातळी २० टक्क्यांखालती गेल्याने चिंता आणखी वाढली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, बीएमसीने अप्पर वैतरणा आणि भातसा तलावातील राखीव १.८१ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा वापरण्यास राज्य सरकारची परवानगी घेतली आहे. तरीही, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही, तर पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा सहा टक्क्यांनी अधिक असला, तरी २०२४ मध्येच ५ जूनपासून ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. सध्या एका टक्के पाणीसाठा सुमारे तीन दिवस पुरतो, अशी महापालिकेची गणिते आहेत.

मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पावसाळा सुरू होईपर्यंत साठा टिकवण्यासाठी नियोजन आखले जात आहे. मात्र, पाणी बचतीसाठी नागरिकांनीही सजग राहण्याची गरज आहे. पाऊस लवकर आला तरच मुंबईच्या नशिबी सुटका, अन्यथा नियोजित पाणीकपात अनिवार्य होण्याची शक्यता आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा