आज अनंत चतुर्थीनिमित्त दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. अशातच मुंबई-पुण्यातील गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. याशिवाय यावेळी बाप्पाला जड अंत: करणाने निरोप देताना डोळे पाणावले जातात. याचेच लाइव्ह अपडेट्स येथे पाहा.

03:21 PM (IST) Sep 25
03:20 PM (IST) Sep 25
मुंबईचा राजा भायखळ्यातील बकरी अड्ड्याजवळ पोहोचला आहे.
02:33 PM (IST) Sep 25
राजा तेजुकायाचा बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे.
02:29 PM (IST) Sep 25
मुंबईच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगच्या येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. याचाच खास फोटो पाहा
02:04 PM (IST) Sep 25
01:51 PM (IST) Sep 25
लालबागचा राजा विसर्जनाठी मार्गस्थ झाला आहे. यासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत त्याला निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.सध्या लालबागचा परिसर गुलालात माखून निघाला आहे.
01:08 PM (IST) Sep 25
लालबागचा राजा विसर्जनासाठी मंडपाजवळ पोहोचला आहे. येथे राजावर पुष्पवृष्टीसह गुलाल उधळला जाणार आहे.
01:07 PM (IST) Sep 25
परळच्या विघ्नहर्ताची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. ही मुर्ती सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे.
12:50 PM (IST) Sep 25
12:42 PM (IST) Sep 25
परळचा लंबोदर विसर्जनासाठी लालबाग परिसरात पोहोचला आहे.
12:27 PM (IST) Sep 25
परळचा सम्राट आणि परळचा लंबोदर विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. दोन्ही गणपती लालबाग परिसरात पोहोचले आहेत.
12:22 PM (IST) Sep 25
परळचा महाराजाचा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. उत्तम बॅलेंन्सिंगचा उदाहरण असलेली ही मुर्ती नेहमीच आकर्षणाचा बिंदू ठरते.
12:12 PM (IST) Sep 25
चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मंडपातून बाहेर आला आहे.
11:48 AM (IST) Sep 25
काळाचौकीचा महाराजाचा श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचला आहे. येथे बाप्पावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
11:20 AM (IST) Sep 25
रंगारी बदक चाळीचा महाराजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
11:00 AM (IST) Sep 25
राजा तेजुकायाच्या मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. संपूर्ण लालबाग-परळ भाग आज गुलालाने माखला जाणार आहे. मिरवणुकीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत बाप्पाला निरोप देत आहेत.
10:52 AM (IST) Sep 25
लालाबागच्या राजाची मिरवणूक सुरू होण्याआधी आता आरती केली जात आहे. यानंतर राजा मिरवणूकीसाठी मार्गस्थ होणार आहे.
10:43 AM (IST) Sep 25
लालबागमधील मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप दिला जात असून गुलालाची उधळण केली जात आहे.