मुंबईत FDAचा मोठा दणका! ओटर्स क्लब, झेप्टोच्या गोदामासह 6 ठिकाणांचे परवाने निलंबित

Published : Aug 19, 2026, 09:21 AM IST
FDA Inspection

सार

मुंबईत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 6 आस्थापनांवर कारवाई केली आहे.

मुंबई : मुंबईत अन्नपदार्थांच्या क्वालिटी आणि स्वच्छतेवरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. वांद्रे येथील प्रसिद्ध ओटर्स क्लब आणि चेंबूरमधील झेप्टोच्या वेअरहाऊसमध्ये गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. यामुळे त्यांचे फूड लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील आणखी चार फूड बिझनेसवरही कारवाई करण्यात आली आहे.

ओटर्स क्लबमध्ये गंभीर अनियमितता

वांद्रे येथील कार्टर रोडवरील ओटर्स क्लबमध्ये एफडीएच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी फरशा तुटलेल्या होत्या. ड्रेनेज व्यवस्था अयोग्य आणि रेफ्रिजरेटरच्या तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे आढळले. तसेच काही भागातील फरशी अस्वच्छ होती. खाद्यतेलाच्या क्वालिटीसाठी आवश्यक असलेल्या Total Polar Compounds (TPC) चाचणीचे रेकॉर्डही उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले.

‘रेग्युलर पनीर’च्या नावाखाली अ‍ॅनालॉग पनीर?

ओटर्स क्लबच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना ‘रेग्युलर पनीर’ या नावाने अ‍ॅनालॉग पनीर दिले जात असल्याचेही एफडीएच्या तपासणीत आढळले. याचा पुरवठा पंजाब सिंध डेअरीकडून केला जात असल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अन्नपदार्थांच्या क्वालिटीसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

झेप्टोच्या चेंबूर वेअरहाऊसमध्ये तापमानाचा नियम धाब्यावर

ई-कॉमर्स डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झेप्टोच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील चेंबूर येथील डार्क स्टोअरवरही एफडीएने कारवाई केली. येथे नॉन-व्हेज फूड स्टोअर करण्यासाठी आवश्यक तापमान राखले जात नसल्याचे आढळले. तपासणीवेळी मांसाचे पदार्थ 9 अंश सेल्सिअस तापमानावर ठेवण्यात आले होते. मात्र नियमांनुसार ते 5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे. फ्रोजन फूड्सचे तापमान -11 अंश सेल्सिअस होते. पण त्यासाठी -18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान आवश्यक असल्याचे एफडीएने नमूद केले.

चेंबूरच्या डार्क स्टोअरमध्येही अस्वच्छता

झेप्टोच्या या केंद्रात तेलकट आणि निसरडे मजले, एक्झॉस्ट फॅनवर साचलेली काळी धूळ आणि अपुरी वायुवीजन व्यवस्था आढळली. नियमित साफसफाईचे वेळापत्रक नसल्यामुळे झुरळे आणि इतर किड्यांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचेही तपासणीत समोर आले.

आणखी चार खाद्य व्यवसायांवर कारवाई

एफडीएने मुंबईतील आणखी चार खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित केले आहेत. दहिसर येथील डेली फ्रेश बेकर्स अँड केक्स येथे अस्वच्छ किचनच्या फरशीवर थेट केक तयार केले जात असल्याचे समोर आले. याशिवाय झुरळे व मुंग्यांचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले.

तसेच खार येथील प्रिन्स ऑफ व्हेल्स रेस्टॉरंटमध्ये तापमान नियंत्रणातील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि उपकरणांची योग्य साफसफाई न केल्याचे आढळले. विलेपार्ले येथील राज ऑइल ट्रेडिंगमध्ये तेलाच्या पाकिटांवर उंदरांनी कुरतडल्याच्या खुणा आणि स्टोअर करण्यात आलेल्या ठिकाणी दुर्गंधी आढळली. तर अंधेरी पूर्व येथील एका कॅफेवरही स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू