Mumbai Coastal Road Melody Road : कोस्टल रोडवरील म्युझिकल रस्ता वादाच्या भोवऱ्यात; आवाजामुळे रहिवाशांचा आक्षेप

Published : Mar 09, 2026, 12:45 PM IST
mumbai coastal road india first musical road jai ho ar rahman bmc innovation infrastructure news

सार

Mumbai Coastal Road Melody Road : मुंबईतील कोस्टल रोडवर सुरू करण्यात आलेल्या ‘मेलडी रोड’ संकल्पनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष रस्त्यावरून वाहनं गेल्यावर ‘जय हो’ या प्रसिद्ध गाण्याची धून ऐकू येते. 

Mumbai Coastal Road Melody Road : मुंबईमधील कोस्टल रोड प्रकल्पावर अलीकडेच ‘मेलडी रोड’ ही अनोखी संकल्पना सुरू करण्यात आली. या रस्त्यावरून वाहनं ठरावीक वेगाने गेल्यावर Jai Ho या जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकू येते. मात्र या नव्या प्रयोगामुळे निर्माण होणाऱ्या आवाजावरून आता वाद निर्माण झाला असून स्थानिक रहिवाशांनी याबाबत आक्षेप नोंदवले आहेत.

हंगेरियन तंत्रज्ञानावर आधारित ‘मेलडी रोड’

कोस्टल रोडवर मरीन ड्राइव्ह टनल (Marine Drive Tunnel) मधून बाहेर पडल्यावर अमरसन्स गार्डन ते ब्रीज कँडी दरम्यान सुमारे 700 मीटर लांबीच्या रस्त्यावर ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हंगेरियन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यावर संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसवण्यात आल्या आहेत. वाहनांच्या चाकांमधून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे स्वर तयार होतात आणि वाहनातील प्रवाशांना गाण्याची धून ऐकू येते.

11 फेब्रुवारीला ‘मेलडी रोड’चे उद्घाटन

या अनोख्या रस्त्याचे उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. विशेष डिझाइन केलेल्या या रस्त्यावर वाहनं 70 ते 80 किमी प्रतितास वेगाने गेल्यावर A. R. Rahman यांच्या ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू येते. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याने अनेकांनी या रस्त्यावरून प्रवास करून हा अनुभव घेतला.

रहिवाशांच्या तक्रारीनंतर बीएमसीचे आदेश

मात्र ब्रिच कँडी परिसरातील रहिवाशांनी या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. सुमारे 650 हून अधिक कुटुंबांनी याबाबत औपचारिक तक्रार करून ती भूषण गगराणी यांच्याकडे सादर केली. या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने या भागातील आवाजाच्या पातळीचा अभ्यास करण्यासाठी नॉईज डेसिबल स्टडी करण्याचे आदेश दिले आहेत.

 नॉईज डेसिबल स्टडी म्हणजे काय?

नॉईज डेसिबल स्टडी म्हणजे एखाद्या भागातील आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी केलेला तांत्रिक अभ्यास होय. साऊंड लेव्हल मीटरसारख्या उपकरणांच्या मदतीने आवाजाची पातळी डेसिबल (dB) मध्ये मोजली जाते. निवासी भागात आवाज पर्यावरणीय मानकांच्या मर्यादेत आहे का, याची तपासणी केली जाते. या अभ्यासाच्या आधारे आवश्यक असल्यास आवाज कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतात.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bombay High Court: नातेवाईकांच्या घरी धुणी-भांडी करायला सांगणे हा छळ नाही, हायकोर्टाचा निकाल
Viral Video : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा, व्हिडिओ तुफान व्हायरल