मुंबईसह उपनगरात आज हलक्या पावसाची शक्यता

Published : May 27, 2024, 03:34 PM IST
tamilnadu rain

सार

मुंबईसह उपनगरात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबई: मुंबईसह उपनगरात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरण राहील तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३४.३ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच आर्द्रताही ७० टक्क्यांहून अधिक होती मात्र मागील काही दिवसांपेक्षा मुंबईकरांना या दोन दिवसांत काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या पश्चिमेकडून वारे वाहणार असल्यामुळे मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा प्रवास वेगाने सुरू आहे. मोसमी वाऱ्यांनी रविवारी बंगालच्या उपसागरचा आणखी काही भाग व्यापला आहे. दरम्यान, ‘रेमल’ चक्रीवादळाची आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला धडक बसणार आहे.

आणखी वाचा:

SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81%, दहावीप्रमाणेच बारावीतही कोकण विभाग अव्वल

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!