
मुंबई - मंगळवारी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) 20 ते 24 मेदरम्यान मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मंगळवारी संध्याकाळी अवघ्या एका तासात पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली.
पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अहवालानुसार, मंगळवारी रात्री 8 ते 9 दरम्यान, पश्चिम उपनगरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद एकसार नगरपालिका शाळा परिसरात 61 मिमी झाली आहे.
आनंद नगर मुनि. शाळा – 53 मिमी
चारकोप मुनि. शाळा सेक्टर 1 – 49 मिमी
मालवणी फायर स्टेशन – 47 मिमी
जुहू डिस्पेन्सरी – 45 मिमी
R/N वॉर्ड – 42 मिमी
वर्सोवा WWTF आणि लॅगून – 40 मिमी
कांदिवली फायर स्टेशन – 39 मिमी
कांदिवली वर्कशॉप – 37 मिमी
मालाड डेपो – 30 मिमी
गोरेगाव – 24 मिमी
आरे कॉलनी – 22 मिमी
वर्सोवा पंपिंग स्टेशन – 21 मिमी
सर्वाधिक पावसाची नोंद:
वीणा नगर मुनि. शाळा, मुलुंड – 16 मिमी
इतर नोंदी:
भांडुप कॉम्प्लेक्स आणि गुरु गोविंद मार्ग – 13 मिमी
मुलुंड चेक नाका – 12 मिमी
मुलुंड फायर स्टेशन – 11 मिमी
T वॉर्ड व आसपासचा परिसर – 10 मिमी
मुख्य मुंबई शहरात केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस ठाण्यातही पावसाचा जोर ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (RDMC) माहितीनुसार, संध्याकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीत 32.20 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर एका तासात 0.60 मिमी पाऊस झाला. त्यामुळे दिवसभरात एकूण पावसाची नोंद 32.80 मिमी अशी झाली.
हवामान खात्याचा इशारा: वाऱ्याचा वेग आणि गडगडाटासह पाऊस IMD ने आपल्या अंदाजात सांगितले की, MMR परिसरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट, आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.