KC To Shilphata Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील आव्हानात्मक अशा बीकेसी ते शिळफाटा भूमिगत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. यासाठी आवश्यक टनेल बोरिंग मशिन्स मुंबईत दाखल होत असून हा मार्ग समुद्राखाली, डोंगराखालून जाणार आहे.
जमीन, डोंगर आणि समुद्र चिरून धावणार 'बुलेट ट्रेन'! बीकेसी ते शिळफाटा कामाला वेग
मुंबई: भारताच्या पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक मोठी आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक असलेल्या 'भूमिगत बोगद्याच्या' कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. यासाठी आवश्यक असणारी महाकाय टनेल बोरिंग मशिन्स (TBM) लवकरच मुंबईत दाखल होत असून, प्रवाशांचे 'सुसाट' प्रवासाचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसत आहे.
25
बोगद्याचे काम होणार सुरू, काय आहे अपडेट?
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते ठाण्यातील शिळफाटा या दरम्यान सुमारे २०.३७ किमी लांबीचा मार्ग भूमिगत असणार आहे. या मार्गाच्या खोदकामासाठी लागणारी दोन अवाढव्य टनेल बोरिंग मशिन्स येत्या सोमवारी जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPA) दाखल होत आहेत. पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
35
समुद्र आणि डोंगराखालून थरारक प्रवास!
बुलेट ट्रेनचा हा मार्ग अभियांत्रिकीचा एक अद्भूत नमुना ठरणार आहे.
खाडीखालून प्रवास: या मार्गातील सुमारे ७ किमीचा बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. भारतात पहिल्यांदाच रेल्वेसाठी असा समुद्रखालचा बोगदा तयार केला जात आहे.
डोंगराखालून मार्ग: शिळफाटा येथील पार्सिक डोंगराखाली सुमारे ११४ मीटर इतक्या प्रचंड खोलीवर हे खोदकाम केले जाईल.
खोली: मुंबईतील इतर भूमिगत मार्ग जमिनीखाली २५ ते ६५ मीटर खोल असतील. विशेष म्हणजे, बीकेसी ते शिळफाटा दरम्यान एकाच मोठ्या बोगद्यात 'अप' आणि 'डाऊन' अशा दोन्ही मार्गिका असतील.
वेग: ही ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावेल, ज्यामुळे मुंबई-अहमदाबाद अंतर अवघ्या काही तासांत कापले जाईल.
पहिला टप्पा: एकूण ५०८ किमीच्या मार्गापैकी सुरत ते वापी दरम्यानचा ९७ किमीचा टप्पा ऑगस्ट २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.
भविष्यातील योजना: मुंबई-अहमदाबाद नंतर देशात आणखी ७ बुलेट ट्रेन प्रकल्प राबवले जाणार असून, त्यामध्ये मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश आहे.
55
महत्त्वाची बाब
कामाचा वेग वाढवण्यासाठी गरज पडल्यास तिसऱ्या मशिनचाही वापर करण्याची तयारी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने (NHSRCL) ठेवली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.