
मुंबई : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील तवा गावाजवळ सोमवारी दुपारी दुधाचा एक टँकर उलटला. हा अपघात मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायवेवर दुपारी ३ च्या सुमारास झाला. हा टँकर मुंबईच्या दिशेने चालला होता. ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाला. टँकरमधून दूध रस्त्यावर सांडू लागताच तिथे लोकांची मोठी गर्दी झाली. लोक बाटल्या, बादल्या आणि मिळेल त्या भांड्यात दूध भरून नेताना दिसले.
हा टँकर मुंबईला जात असतानाच हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, फक्त ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली आहे.टँकर उलटताच आतलं सगळं दूध रस्त्यावर सांडायला लागलं. हायवेचा बराचसा भाग दुधाने भरून गेला होता. हे पाहताच आजूबाजूच्या गावातील लोक आणि हायवेवरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तिथे एकच गर्दी केली.
A milk tanker overturned on the Mumbai-Ahmedabad national highway near Tawa in Palghar district in Maharashtra on Monday, triggering chaotic scenes as locals rushed to the spot to collect the leaking milk. Nobody was injured in the incident. pic.twitter.com/MaxzVDAEop
— Richa Pinto (@richapintoi) September 22, 2026
रस्त्यावर सांडलेलं दूध बाटल्या आणि डब्यांमध्ये भरण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. टँकर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर काही काळ वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार, ट्रक आणि इतर गाड्या हायवेवरच अडकून पडल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गर्दी पांगवून वाहतूक नियंत्रणात आणली. रस्त्यावरून अपघातग्रस्त टँकर बाजूला काढल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. हा टँकर नेमका कसा उलटला, याचा पोलीस आता तपास करत आहेत.