मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची ५००० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' भागात मिळणार सुवर्णसंधी

Published : Feb 14, 2026, 09:02 PM IST

MHADA Mumbai Lottery 2026: म्हाडा मुंबई मंडळ २०२६ सालासाठी तब्बल ५००० घरांची सोडत काढण्याच्या तयारीत आहे. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला जाहिरात अपेक्षित असून, गोरेगाव, सायन, बोरिवली अशा मोक्याच्या ठिकाणी घरे उपलब्ध होतील. 

PREV
15
मुंबईत म्हाडाची ५००० घरांसाठी बंपर लॉटरी

मुंबई : मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरांमध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाने २०२६ सालासाठी तब्बल ५ हजार घरांची सोडत काढण्याची जय्यत तयारी पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी घरांच्या उपलब्धतेअभावी रखडलेली ही प्रक्रिया आता मोठ्या धमाक्यात पार पडणार आहे. 

25
जाहिरात कधी येणार?

म्हाडाच्या या भव्य गृहनिर्माण सोडतीची अधिकृत जाहिरात मार्चअखेर किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरातील मोक्याच्या ठिकाणी ही घरे उपलब्ध होणार आहेत. 

35
कुठे आणि किती घरे उपलब्ध? (प्रमुख ठिकाणे)

मुंबईतील विविध भागांमध्ये मध्यम आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती युद्धपातळीवर सुरू आहे.

गोरेगाव (पत्राचाळ): येथे सर्वाधिक म्हणजे २,५०० घरांची सोडत निघणार आहे. हे प्रामुख्याने अल्प आणि मध्यम गटासाठी असतील.

प्रतीक्षानगर (सायन): २२ मजल्यांच्या ३ इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून, येथे २६४ मध्यम गटातील घरे उपलब्ध होतील.

बोरिवली (मागाठाणे): उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) १२८ आलिशान घरांची २० मजली इमारत उभी राहत आहे.

इतर ठिकाणे: विक्रोळी (कन्नमवार नगर), चेंबूर (टिळकनगर) आणि अँटॉप हिल या भागातही मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे. 

45
घराचा ताबा कधी मिळणार?

जरी २०२६ मध्ये या घरांची सोडत जाहीर होणार असली, तरी बांधकामाच्या स्थितीनुसार लाभार्थ्यांना घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी २०२७ ते २०२९ पर्यंत वाट पाहावी लागू शकते. मागाठाणे येथील प्रकल्पाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 

55
महत्त्वाची टीप

गेल्या वर्षी घरांची संख्या कमी असल्याने सोडत रखडली होती, मात्र यंदा मुंबई मंडळाने ती कसर भरून काढण्यासाठी ५००० घरांचा मोठा टप्पा गाठला आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories