Mumbai Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; पोलिसांकडून अधिक तपास सुरू

Published : Apr 27, 2026, 10:35 AM IST
Accident

सार

Mumbai Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर तीन दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. 

Mumbai Marine Drive Accident : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने शहर हादरले आहे. गिरगाव चौपाटीजवळ तीन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, राज्यातील इतर ठिकाणीही घडलेल्या अपघातांत एकूण पाच जणांचा जीव गेला आहे.

मरीन ड्राईव्हवर भीषण धडक; तिघांचा जागीच मृत्यू

आज पहाटे सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीजवळ एक स्पोर्ट्स बाईक आणि दोन स्कूटी यांच्यात भीषण अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की तिन्ही दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ६०-६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक, एक तरुण आणि एक तरुणी यांचा समावेश आहे. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, घटनास्थळावर रक्ताचे डाग आणि तुकडे विखुरलेले दिसत होते.

पोलिस तपास सुरू; ओव्हरस्पीडचा संशय

अपघाताची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ओव्हरस्पीड किंवा तांत्रिक बिघाड यांचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू