मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Published : Jun 08, 2024, 11:05 AM IST
Mumbai local

सार

रविवारी 9 जूनला रेल्वे रूळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

मुंबई: रविवारी 9 जूनला उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे रूळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा या कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगा ब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी - वांद्रे अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्याच बरोबर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असले. सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या सर्व लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील. विद्याविहारनंतर या लोकल पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हर्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. या कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि वाशी अप- डाऊन मार्गावरी लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. शिवाय सीएसएमटी ते गोरेगाव -वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ही रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल - कुर्लादरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मध्य आणि हार्बर प्रमाणे पश्चिम रेल्वेवरही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यानुसार चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप- डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक काळात जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. शिवाय ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच बरोबर चर्चगेट लोकलला वांद्रे आणि दादरपर्यंत चालविण्यात येणार आहे.

 

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Viral Video : मुंबईत ८ महिने राहिल्यानंतर जपानी तरुणीने सांगितला अनुभव, व्हिडिओ व्हायरल
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल