Ladki Bahin Yojana : ही प्रक्रिया न केल्यास पुढील हफ्ता मिळणार नाही, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती!

Published : Sep 19, 2025, 09:27 AM IST

Ladki Bahin Yojana लाखो भगिनींना लाडकी बहिण या योजनेतून दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. पण अलीकडच्या काळात काही घोटाळे झाल्याची प्रकरणे समोर आली. त्यामुळे सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

PREV
18
ही प्रक्रिया केली अनिवार्य

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही एक महत्त्वाची योजना आहे. राज्यातील लाखो भगिनींना या योजनेतून दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. पण अलीकडच्या काळात या योजनेत काही घोटाळे झाल्याची प्रकरणे समोर आली. अनेक ठिकाणी अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं. या पार्श्वभूमीवर शासनाने योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

पुढे वाचा… कशी करायची e-KYC, त्यांनी काय माहिती दिली आणि त्यांची सोशल मीडिया पोस्ट जशीची तशी…

28
गैरव्यवहार थांबवण्यासाठी नवा निर्णय

मागील काही महिन्यांत योजनेतील गैरव्यवहारांमुळे शासनाने अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली होती. यामुळे खरी पात्र महिला देखील चिंतेत होत्या. आता नव्या नियमांनुसार, ज्या महिलांनी e-KYC पूर्ण केली असेल, त्यांनाच पुढील हप्ते मिळतील. जे लाभार्थी हे करणार नाहीत, त्यांना योजनेचा लाभ बंद होईल.

38
मंत्री आदिती तटकरे यांची स्पष्ट सूचना

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती थेट सोशल मीडियावरून दिली. त्यांनी सांगितलं की –

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे.
  • सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर e-KYC ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • सर्व महिलांनी आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी.
  • ही प्रक्रिया अतिशय सोपी असून, योजनेचा लाभ नियमित मिळत राहण्यासाठी अत्यावश्यक आहे.
48
प्रक्रिया कशी करायची?

e-KYC करण्यासाठी महिलांना आधारकार्डासारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. पोर्टलवर लॉगिन करून सहज ही प्रक्रिया पूर्ण करता येते. शासनाने याबाबत सविस्तर सूचना देखील प्रसिद्ध केल्या आहेत.

58
दरवर्षी नियमित प्रक्रिया

योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी फक्त एकदाच नाही तर दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या आत e-KYC करणं बंधनकारक राहील. शासनाने यासाठी अधिकृत परिपत्रकही जारी केलं आहे. ठरलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांची नावे यादीतून वगळली जातील आणि त्यासाठी लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील.

68
महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

या निर्णयामुळे लाभार्थी महिलांना थोडीशी अतिरिक्त जबाबदारी आली असली तरी दीर्घकाळात ही प्रक्रिया त्यांच्या फायद्याची ठरणार आहे. कारण यामुळे योजनेतून केवळ खरी पात्र महिला टिकतील आणि आर्थिक मदत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल.

78
पारदर्शकता आणि भविष्यातील योजनांचा फायदा

सरकारच्या मते, e-KYC प्रक्रिया केल्याने महिलांना केवळ ‘लाडकी बहीण योजना’चाच लाभ मिळणार नाही, तर भविष्यातील इतर शासकीय योजनांसाठी देखील ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. म्हणजेच ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी महिलांच्या हक्काच्या योजनांपर्यंत त्यांना सहज पोहोचवेल.

88
कठोर निर्णय घेतले

‘लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची आहे. पण योजनेत फसवणूक टाळण्यासाठी सरकारने e-KYC अनिवार्य करून योग्य पाऊल उचललं आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी भगिनींनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी e-KYC केली, त्यांनाच हक्काचे पैसे नियमितपणे खात्यात मिळतील.

Read more Photos on

Recommended Stories