Kurla Landslide : कुर्ल्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना; दोघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Published : Aug 12, 2026, 10:11 AM ISTUpdated : Aug 12, 2026, 10:18 AM IST
Kurla Landslide : कुर्ल्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना; दोघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

सार

Kurla Gaushiya Chawl Landslide : मुंबईच्या कुर्ला परिसरात पावसामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ आणि बीएमसीच्या टीमकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

कुर्ला : मुंबईतील कुर्ला भागातील चिराग नगरमधील गौसिया चाळीत आज बुधवारी पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी राठोड मेडिकलजवळ ही दरड कोसळली. या दुर्घटनेत जवळपास सहा ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डीसीपी गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे ही दरड कोसळली. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसंच, बीएमसी, एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांचे अधिकारीही बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दोघांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा

डीसीपी शिंदे यांनी 'एएनआय'ला सांगितलं, "पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात दरड कोसळली आहे. आतापर्यंत दोन मृतदेह सापडले असून बचावकार्य सुरू आहे. पोलीस कर्मचारी, बीएमसी, एनडीआरएफ आणि इतर आवश्यक पथकं घटनास्थळी तैनात आहेत. ही घटना पहाटे ३ च्या सुमारास घडली. अंदाजे ४-५ जण अजूनही अडकले असण्याची शक्यता आहे."

या दुर्घटनेत सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) हे दोघे जखमी झाले आहेत. तर, सापडलेले दोन मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगर) अविनाश ढाकणे यांनीही घाटकोपरमधील घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवणार

नियुक्त अधिकारी गजानन जैतापकर यांनी सांगितले की, घटनास्थळी बचावकार्य सध्या सुरू आहे. सरकार पुढील उपाययोजनांवर विचार करत असून, बाधित भागातील रहिवाशांना लवकरच सुरक्षित ठिकाणी हलवले जाण्याची शक्यता आहे.

जैतापकर यांनी पत्रकारांना सांगितलं, “यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पावसाळ्यापूर्वी अनेक घरांना नोटिसा दिल्या होत्या. सध्या बचावकार्य सुरू आहे. आम्ही पुढील कारवाईबाबत निर्णय घेत आहोत. बाधित भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाऊ शकतं”. या प्रकरणाची अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल
Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक