Indian First Bullet Train अशी दिसेल भारताची पहिली बुलेट ट्रेन, शिंकान्सेनची चाचणी सुरु, बघा VIDEO

Published : Jun 05, 2025, 01:39 PM ISTUpdated : Jun 05, 2025, 01:45 PM IST
bullet train

सार

भारतातील पहिल्या शिंकान्सेस ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरु झाली आहे. याचे फोटो आम्हाला मिळाले आहेत. ही भारताची पहिली बुलेट ट्रेन राहणार आहे.

नवी दिल्ली / टोकियो : भारतात बुलेट ट्रेन कधी धावणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सध्या अहमदाबाद ते मुंबईच्या रेल्वे मार्गाचे काम जोमाने सुरु आहे. भारतातील पहिल्या शिंकान्सेस ट्रेनची जपानमध्ये चाचणी सुरु झाली आहे. याचे फोटो आम्हाला मिळाले आहेत. ही भारताची पहिली बुलेट ट्रेन राहणार आहे.

भारताच्या परिवहन क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आलं असून, देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी वापरण्यात येणाऱ्या शिंकान्सेन रेल्वेगाड्यांनी जपानमध्ये चाचणी फेजमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्प (MAHSR) अंतर्गत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.

पहिल्या दोन बुलेट ट्रेन भेट स्वरुपात

भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या अंतर्गत, जपान भारताला दोन शिंकान्सेन ट्रेन सेट भेट देणार आहे. E5 आणि E3 सिरीजमधील प्रत्येकी एक गाडी. या गाड्या 320 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. या गाड्या 2026 च्या सुरुवातीस भारतात दाखल होणार असून, भारतीय भूप्रदेश आणि हवामानात त्यांची काटेकोर चाचणी केली जाणार आहे.

अत्याधुनिक बुलेट ट्रेनची चाचणी

या चाचणी गाड्यांमध्ये अत्याधुनिक निरीक्षण प्रणाली बसवण्यात आली आहे, जी गाडी चालवण्याच्या स्थिती, तापमान सहनशीलता आणि धूळ प्रतिरोध यासारखी महत्त्वाची मोजमापं करेल. या परीक्षणातून मिळणारे डेटा भारतात “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत भविष्यात तयार होणाऱ्या E10 सिरीज शिंकान्सेन गाड्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

मुंबई अहमदाबाद अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत

508 किलोमीटर लांबीच्या MAHSR मार्गावर १२ स्थानके असतील, ज्यात ठाणे, विरार, बोईसर, वलसाड, सूरत आणि वडोदरा यांचा समावेश आहे. या मार्गावर प्रवासाचा कालावधी केवळ २ तास ७ मिनिटे असेल. सध्याच्या तुलनेत अनेक तासांची बचत होईल.

जपानी तंत्रज्ञानाची जोड

या प्रकल्पात जपानच्या राष्ट्रीय उच्चगती रेल्वे महामंडळ (JR East) च्या सहभागामुळे, जागतिक दर्जाचे रेल्वे सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे निकष भारतात लागू केले जात आहेत. भारत-जपानमध्ये 2016 मध्ये झालेल्या करारानुसार, या प्रकल्पासाठी सुमारे ८०% निधी कमी व्याजदराच्या येन कर्जाच्या माध्यमातून जपानकडून मिळतो आहे.

 

 

देशाच्या रेल्वे इतिहासातील महत्त्वाचा क्षण

या प्रकल्पामुळे केवळ वेग वाढणार नाही, तर रोजगार निर्मिती, तांत्रिक कौशल्य हस्तांतरण, पर्यटनवृद्धी आणि व्यापाराला चालना मिळेल. मुंबई-अहमदाबाद मार्गाचे कार्यान्वयन झाल्यानंतर भारतात उच्च कार्यक्षमतेचा, जलद आणि आधुनिक सार्वजनिक परिवहनाचा नवा अध्याय सुरू होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!