Food Inflation : जेवण करणं महागलं! व्हेज-नॉनव्हेज थाळीच्या दरात मोठी वाढ

Published : Aug 07, 2026, 04:28 PM IST
Food Inflation : जेवण करणं महागलं! व्हेज-नॉनव्हेज थाळीच्या दरात मोठी वाढ

सार

क्रिसिलच्या 'रोटी राईस रेट' रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात घरगुती व्हेज थाळी ४ टक्के, तर नॉन-व्हेज थाळी ९ टक्क्यांनी महागली आहे. कांदा, तेल, LPG आणि बॉयलर चिकनच्या वाढत्या किमतींमुळे ही दरवाढ झाली आहे.

मुंबई : कांदा, तेल आणि LPG गॅसच्या वाढत्या दरांमुळे जुलै महिन्यात घरी जेवण बनवणं महाग झालं आहे. क्रिसिल इंटेलिजन्सच्या मासिक 'रोटी राईस रेट' रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत व्हेज थाळी ४ टक्क्यांनी महागली आहे. तर दुसरीकडे, बॉयलर चिकनचे दर वाढल्याने नॉन-व्हेज थाळीच्या दरात तब्बल ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

वर्षभराच्या दरांची तुलना

व्हेज थाळी महाग का झाली?

रिपोर्टनुसार, कांदा, तेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे जेवणाचा खर्च वाढला. बटाटा आणि टोमॅटोचे दर कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला, पण दरवाढ रोखता आली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे भाव २० टक्क्यांनी वाढले, कारण बाजारात साठवलेला रब्बी कांदा चढ्या दराने विकला जात आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिकाचं आणि साठवलेल्या कांद्याचं मोठं नुकसान झालं होतं, ज्यामुळे पुरवठा कमी झाला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडचणींमुळे खाद्यतेल ११ टक्क्यांनी आणि LPG सिलेंडर १० टक्क्यांनी महागला. त्याचवेळी, रब्बीचं उत्पादन २-३ टक्क्यांनी वाढल्याने बटाट्याचे भाव १२ टक्क्यांनी कमी झाले. तर उन्हाळी पिकाची आवक उशिरा झाल्याने जुलैमध्ये टोमॅटोचे भाव २ टक्क्यांनी खाली आले.

नॉन-व्हेज थाळीचा खर्च का वाढला?

नॉन-व्हेज थाळी महाग होण्यामागे मुख्य कारण बॉयलर चिकनचे वाढलेले दर आहेत. थाळीच्या एकूण खर्चापैकी जवळपास ५० टक्के खर्च चिकनवर होतो आणि त्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढले. कोंबड्यांच्या खाद्याचे वाढलेले दर आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये असलेला श्रावण महिना यंदा ऑगस्टमध्ये आल्याने दरांवर परिणाम झाला.

महिन्यागणिक दरांची स्थिती

मासिक दरांची तुलना केल्यास, व्हेज थाळीच्या दरात २ टक्क्यांची वाढ झाली. यामागे कांद्याच्या दरात झालेली २३ टक्के आणि बटाट्याच्या दरात झालेली ४ टक्के वाढ कारणीभूत आहे. मात्र, टोमॅटोचे दर १ टक्क्याने कमी झाल्याने ही वाढ मर्यादित राहिली.

दुसरीकडे, जूनच्या तुलनेत नॉन-व्हेज थाळीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मागणी कमी झाल्याने बॉयलर चिकनचे दर २ टक्क्यांनी घसरले, ज्यामुळे भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरांचा परिणाम दिसून आला नाही. रिपोर्टनुसार, येत्या काळातही अन्नधान्य आणि ऊर्जेच्या किमतीतील चढ-उतारामुळे घरगुती जेवणाच्या खर्चावर परिणाम होत राहील. (ANI)

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल
Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक