मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात; अनेक ठिकाणी पाणी भरल्यामुळं ट्रॅफिकला सुरुवात
मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यामुळं अनेक भागांमध्ये पाणी वाचायला सुरुवात झाली आहे. कोकणातील अनेक किनारपट्टीच्या भागात पाऊस चांगला सुरु झाला आहे.
26
मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात
मुंबईसह उपनगरात दिवसभर पावसाची संततधार सुरूच आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.
36
आठवड्याच्या पहिल्या दिवशी अतिवृष्टी सुरु
आज आठवड्याचा पहिला दिवस असून आजही मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
46
रस्ते वाहतुकीवर झाला परिणाम
मुंबईतील पावसाचा रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
56
गाड्यांच्या लांबच लांब रांगा
गाड्यांच्या ट्रॅफिकमध्ये लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.
66
किनारी भागात जोरदार पाऊस
किनारी भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील काही भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाल्याचं दिसून आलं आहे.