
मुंबई: मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याचं दिसून आलं आहे. या मुसळधार पावसाचा परिणाम हा रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून आलं आहे. सकाळच्या सुमारास मुंबईतील मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली होती. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायनदरम्यानच्या अप-फास्ट आणि डाउन-फास्ट लोकल सकाळी ११.२५ पासून बंद ठेवण्यात आली होती तर त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११.४५ पासून स्लो लोकल सेवाही स्थगित करण्यात आली होती.
अनेक लोकलच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याची माहिती समजली होती. पण आता परत एकदा प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर मात्र अजूनही कायम आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचा जोर मात्र अजूनही तसाच असल्याचं दिसून आलं आहे.
आता मात्र काही ठिकाणची रेल्वे सेवा सुरु झाल्याचं दिसून आला आहे. मात्र जरी लोकल पुन्हा सुरू झाली असली तरी देखील ट्रॅकवर साचलेल्या पाण्यांमुळे अडथळा निर्माण होत असून, अजूनही ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलेलंच आहे. मोठ्या प्रमाणावर पडत असलेल्या पावसामुळे परत एकदा चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
रेल्वेच्या रुळावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबईच्या कुर्ला आणि सायन स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल आणि एक्सप्रेस खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे, मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या लोकल रद्द केल्यानं कल्याणच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशी अडकून पडले आहेत. लांब पल्याच्या ट्रेन्सला काही प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.