
Mumbai: सध्याच्या काळात मित्र, नातेवाईक ही जवळची लोकच जीवावर उठल्याच दिसून येत आहे. ड्रिंकमधून विष देऊन मित्राची हत्या केल्याची घटना गोवंडी येथे घडली आहे. उंदीर मारण्याचं औषध देऊन मित्राची हत्या करण्यात आली आहे. मित्र आपल्यासोबत बोलत नसल्याच्या कारणातून दुसऱ्या मित्रानं त्याचा काटा काढला आणि अखेर त्याचा जीव घेतला.
गोवंडीच्या शिवाजीनगर येथून जिशान अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही महिन्यांपूर्वी कोणालाही न सांगता झिशान शाहिद शेखला घेऊन नागपूरला गेला होता. तिथून परत आल्यानंतर शाहिदच्या वडिलांचे आणि झिशानचे कडाक्याचे भांडण झालं. यावेळी झिशानने मित्राच्या वडिलांना शिव्या दिल्या. यावेळी शाहिदच्या वडिलांनी आपलाच भाऊ आहे म्हणून त्याची तक्रार दाखल केली नाही.
त्यानंतर आपल्याच भावाने मुलाच्या कोल्ड्रिंक मिळवले असल्याचे शाहिदच्या वडिलांचे लक्षात आले. आपल्यासोबत मित्र बोलत नाही त्यामुळे रागात येऊन त्यानं हे पाऊल उचलल्याचे सांगितलं आहे. मुलाच्या वडिलांनी आपला मुलगा बेशुद्ध पडल्यावर डॉक्टरांना घरी बोलावलं पण नंतर डॉक्टरांच्या तपासणीत तो मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलं होतं.
आपण सोनूला स्टिंगच्या बॉटलमधून कोल्ड्रिंक पाजल्याची कबुली झिशानने दिली. त्यानं मी थोडंच कोल्ड्रिंक पिऊन बाकी सोनूला दिल्याचं सांगितलं. माझं पोट दुखायला लागल्यावर मी झोपेतून उठलो, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो न उठल्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आलं होतं. पोलिसांनी या घटनेची चौकशी केल्यावर आपणच औषध दिल्याचं झिशानने कबूल केलं आहे.