Gold Rate Today : सोन्याचा भाव उतरला, चांदीही ५००० रुपयांनी स्वस्त; काय आहे आजचा गोल्ड रेट?

Published : Jul 13, 2026, 04:39 PM IST
Gold Rate Today

सार

Gold - Silver Rate Today : सोने-चांदी दरात आज सोमवारी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मौल्यवान धातूच्या दरांवर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई : सोने आणि चांदीच्या किमतीत आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीच सोमवारी घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोने आणि चांदी स्वस्त झालं आहे. मौल्यवान धातूच्या किमतीतील घसरण सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. सोन्याचा भाव २००० रुपयांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरात ५४०० रुपयांची घसरण झाली आहे.

सराफा बाजारातील सोने-चांदीचा दर काय?

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १४२० रुपयांनी घसरला. या घसरणीसह सोने दर १,४२,९१० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. २२ कॅरेट सोन्याचा भाव १३०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे २२ कॅरेटचा एक तोळ्याचा भाव १,३१,००० इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव १०७० रुपये इतका एका तोळ्यामागे कमी झाला आहे. त्यामुळे १८ कॅरेट सोनं भाव आज १,०७,१८० रुपये इतकं आहे.

सोने - चांदी दरात घसरण का?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम सोने-चांदी दरांवर होतो आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आज कच्च्या तेलाचा भाव ४ टक्क्यांनी वाढला आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद पडण्याच्या शक्यतेमुळे आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती आहे. महागाई वाढली आहे. तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने डॉलरही मजबूत झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात दबाव निर्माण झाला आहे. शिवाय बँकांचे व्याजदरही चढेच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा सर्व बाबींचा सोने-चांदीच्या दरावरही परिणाम झाला आहे.

अमेरिका - इराण संघर्षाचा सोने-चांदी दरावर परिणाम

अमेरिका आणि इराणचा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केलं. यावेळी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पुन्हा एकदा बंद केल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्याचा परिणामही मौल्यवान धातू सोने-चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट