Vinayak Raut : ३ वर्ष एकत्र नाही, तिच्या मागण्या... सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Published : Jul 12, 2026, 03:41 PM IST
Vinayak Raut

सार

Vinayak Raut Reaction Daughter In Law Girija Allegations : शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेने केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत त्यांनी आरोप फेटाळले आहेत.

मुंबई : शिवसेना ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांच्या सुनेने कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने तिचा पती आणि नगरसेवक गितेश राऊत आणि सासू शलाका राऊत यांच्यावर मानसिक, शारीरिक छळ तसंच जादूटोण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. सुनेने केलेल्या गंभीर आरोपांवर आता विनायक राऊत यांनी त्यांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊतांची सुनेच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया 

विनायक राऊत यांनी त्यांच्या कुटुंबावर, मुलावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच सुनेने तक्रार करण्यामागे काहीतरी काळबेरं आहे, असं म्हणत सुनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही जादूटोणा, अघोरी प्रथा पाळत नाही. आमच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. माझ्या मुलासोबत सून गिरीजा मागील तीन वर्षांपासून राहत नाही. अलिकडे त्यांच्या घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर अन्याय होत होता, तर तिने आता इतक्या वर्षांत २०१८ ते २०२२ पर्यंत तक्रार का केली नाही? या काळात त्या त्यांच्या आई-वडिलांसोबत ये-जा करत होत्या. असा प्रकार खरंच झाला असेल, तर त्याचवेळी तक्रार का केली नाही? आता इतक्या वर्षांनी २०२६ मध्ये का तक्रार केली. यामागे काहीतरी काळंबेर नक्कीच आहे.’ 

'मागण्या पूर्ण न केल्याने तिचे आरोप' - विनायक राऊत

'सुनेकडून आमच्या कुटुंबाकडे मोठमोठ्या मागण्या केल्या जात होत्या. तिने घरखर्चासाठी २ लाख रुपये, ५ कोटी रोख रक्कम मागितली होती. शिवाय मुंबईत ३ बीएचके फ्लॅट, ऑटोमेटिक कारची मागणी केली होती. अशी एकूण १० ते १२ कोटींची मागणी होती', असे गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केले आहेत.

'आम्ही सुनेच्या या मागण्या मान्य केल्या नाही. या मागण्या पूर्ण न झाल्यानेच तिने आमच्यावर आरोप केले', अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट