Girija Raut : पती शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम, हे लपवण्यासाठी.... विनायक राऊतांच्या सुनेचे गंभीर आरोप

Published : Jul 12, 2026, 07:19 PM IST
Girija Raut on Gitesh Raut

सार

Girija Raut Allegations on Gitesh Raut : विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी संपूर्ण कुटुंबासह त्यांच्या पतीवर गितेश राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : शिवसेना नेते विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी पती गितेश राऊतसह संपूर्ण कुटुंबावर मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम असल्याचाही गंभीर आरोप केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या गिरीजा राऊत?

गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं, की 'प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून खोटं बोलून आमची फसवणूक केली. पूर्णपणे प्लॅन करुन त्यांनी आमचा घात केला आहे. लग्नाआधी सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्र वेगळं होतं. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या, भावनात्मक छळ गितेश आणि त्याच्या कुटुंबियांनी ७ वर्ष छळवणूक केली.'

'राजकीय पार्श्वभूमी, सबळ कुटुंब असल्याने कुठेच, कधीच तक्रार केली नव्हती. आज ना उद्या परिस्थिती बदलेल, सर्व आनंदाने राहू या आशेवर सगळं सहन करत गेली. आनंदाने राहू असं काहीही घडलं नाही. त्यांनी मला शाब्दिक सुनावणी, मारहाण केली ते लपवण्यासाठी राऊत आता खोटं वक्तव्य करत आहेत.'

'डिसेंबर २०१७ लग्न झाल्यापासून सप्टेंबर २०१८ पर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नव्हते. त्यासाठी आमच्या कुटुंबात बसून बोलणी केली. गणपतीनंतर यावर बोलू असं ठरलं. पण गणपतीनंतर घाबरवणारा घटना घडली. अघोरी प्रकार घडले. सप्टेंबर २०१८ ते २०२२ पर्यंत ते सुरुच ठेवलं. या काळात त्यांनी अघोरी कृत्य केलं, मेडिकल ट्रिटमेंट केल्या, अँटी डिप्रेशन गोळ्या दिल्या. त्याने मला त्रास झाला. वेगवेगळ्या बाबांकडे मला इलाजासाठी घेऊन जायचे. जिवंत कोंबड्या अंगावरुन उतरवायचे, तांब्याच्या तार, कणकेच्या बाहुल्या, डोक्यावरचे केस घेऊन उतारे करत होते. गोमुत्र, उदी, हळद खायला द्यायेच.'

'त्यांचा मुलगा शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं. त्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बरबाद केलं आहे. गितेश राऊत यांनी विकृत वागणूक देऊन मला टॉर्चर केलं, मला ७ वर्षात ट्रॉमा दिला', असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट