गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची मोठी घोषणा; मुंबई-कोकण मार्गावर या 5 विशेष रेल्वेगाड्या धावणार

Published : Jul 28, 2026, 02:19 PM IST
Indian Railways

सार

गणेशोत्सव 2026 निमित्त कोकण रेल्वेने मुंबई CSMT, LTT, सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि खेड मार्गावर एकूण पाच विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत.

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मोठी खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव 2026 दरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मुंबई CSMT, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), रत्नागिरी, सावंतवाडी रोड आणि खेड मार्गावर विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्या 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत धावणार आहे. मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई CSMT – सावंतवाडी रोड दरम्यान दोन दैनिक विशेष गाड्या

  • कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 01103/01104 आणि 01151/01152 या दोन विशेष गाड्या मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज धावतील. 
  • 01103 मुंबई CSMT–सावंतवाडी रोड ही गाडी 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान दररोज दुपारी 3.30 वाजता मुंबई CSMT येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  • 01104 सावंतवाडी रोड–मुंबई CSMT ही गाडी 12 ते 27 सप्टेंबरदरम्यान पहाटे 4.35 वाजता सावंतवाडीहून सुटून सायंकाळी 4.40 वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल. याशिवाय 01151/01152 ही आणखी एक दैनिक विशेष गाडी देखील याच मार्गावर धावणार आहे.

LTT–सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष ट्रेन

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोड दरम्यान 01129/01130 ही साप्ताहिक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.15 आणि 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8.45 वाजता LTT वरून गाडी सुटेल.परतीची गाडी सावंतवाडी रोडवरून रात्री 11.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता LTT येथे पोहोचेल.

मुंबई–रत्नागिरी विशेष ट्रेनचीही घोषणा

  • रत्नागिरीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 01153/01154 या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
  • मुंबई CSMT–रत्नागिरी विशेष गाडी 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान दररोज सकाळी 11.30 वाजता सुटेल. 
  • रत्नागिरी–मुंबई CSMT  विशेष गाडी 12 ते 27 सप्टेंबरदरम्यान दररोज पहाटे 4 वाजता रत्नागिरीहून सुटेल.

दिवा–खेड MEMU विशेष सेवा

उपनगरी आणि स्थानिक प्रवाशांसाठी 01155/01156 दिवा–खेड MEMU विशेष गाडीही चालवण्यात येणार आहे. ही गाडी 11 ते 27 सप्टेंबरदरम्यान (22 सप्टेंबर वगळता) दररोज धावेल. दिवा येथून सकाळी 7.15 वाजता सुटणारी गाडी दुपारी 2.35 वाजता खेड येथे पोहोचेल. परतीची गाडी खेडहून सायंकाळी 4 वाजता सुटून रात्री 10.50 वाजता दिवा येथे पोहोचेल.

22 डब्यांच्या विशेष गाड्या

मुंबई–सावंतवाडी आणि मुंबई–रत्नागिरी विशेष गाड्यांमध्ये 22 डबे असतील. यामध्ये:

  • 2 एसी 3-टियर डबे
  • 12 स्लीपर डबे
  • 6 जनरल डबे
  • 2 एसएलआर (SLR) डबे

तर दिवा–खेड MEMU विशेष गाडी 12 डब्यांची असेल.

 

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट