'जंतरमंतर लाठीमारावर गृहमंत्र्यांनी संसदेत उत्तर द्यावे'; संजय राऊतांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

Published : Jul 28, 2026, 11:29 AM IST
Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut (Photo/ANI)

सार

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद झाली. यावेळी राऊत यांनी जंतरमंतरवरील कथित लाठीमार, नीट पेरपरफुटी विरोधातील आंदोलन, MHT-CET वाद अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलन, जंतरमंतरवरील कथित लाठीमार, एमएच सीईटी (MHT-CET) परीक्षेवरील आरोप आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेवरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईची जबाबदारी निश्चित करावी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावे आणि पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

जंतरमंतर लाठीमाराची जबाबदारी कोण घेणार?

संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की, जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला. अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचे आरोप आहेत. या घटनेची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या घटनेबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, असेही ते म्हणाले.

एमएच सीईटी आणि पेपरफुटीवर सरकारवर निशाणा

राऊत यांनी एमएच सीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली. राज्य सरकारने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी मान्य कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होणार नाही, याची खात्री द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्राची शिक्षणातील प्रतिमा घसरली

महाराष्ट्र हे एकेकाळी शिक्षण क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य होते. मात्र आज शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे. यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजकीय समीकरणांवरही भाष्य

राज्यातील राजकीय घडामोडींवर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. पक्षाची विचारधारा भाजपच्या विचारांशी जुळत नसल्याचा दावा राऊतांनी पत्रकार परिषदेवेळी केला.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, नीट प्रकरणातील आरोपांमुळे त्यांना पद सोडावे लागले. या प्रकरणाचा राजकीय प्रचार करण्याऐवजी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर सरकारने भर द्यावा, असेही त्यांनी म्हटले.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट