Beed Crime : कला केंद्रातील बाईचा नाद, iPhone, बंगला, 5 एकर जमीन.. अखेर बीडच्या माजी सरपंचाने डोक्यात गोळी मारली, कोण आहे पूजा गायकवाड?

Published : Sep 10, 2025, 01:46 PM IST

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाने नर्तकीवरील आकर्षण आणि पैशासाठी झालेल्या वादातून हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सासुरे (ता. बार्शी) येथे सोमवारी मध्यरात्री कारमध्येच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 

PREV
19
नर्तकीविरोधात गुन्हा दाखल

गोविंद जगन्नाथ बर्गे (३४) असं त्यांचं नाव आहे. या घटनेनंतर बर्गे यांचे मेहुणे जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नर्तकी पूजा देविदास गायकवाड (२१) हिने पैशांसाठी सातत्याने तगादा लावला तसेच दुष्कर्माचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

29
प्रेमसंबंधातून पैशांची मागणी

लोकनाट्य कला केंद्रात जाणाऱ्या गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाडशी ओळख झाली होती. हळूहळू ओळख प्रेमसंबंधात बदलली. गोविंद यांनी तिला महागडा मोबाइल, दागदागिने असे गिफ्ट दिले होते. मात्र नंतर पूजाने संवाद टाळायला सुरुवात केली. गोविंद नैराश्यात गेले होते. या काळात तिने घर, शेतजमीन आपल्या नावावर करण्याची मागणी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

39
कारमध्ये सापडला मृतदेह

सोमवारी मध्यरात्री गोविंद गायकवाडच्या पूजा गायकवाडच्या घरी गेले. त्यांनी तिला अनेक फोन केले. तरी ती फोन घेत नव्हती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह कारमध्येच आढळून आला. कार आतून लॉक होती आणि उजव्या कपाळाला गोळी लागलेली होती.

49
कुटुंब हादरले

गोविंद विवाहित होते. त्यांना दोन लहान मुलं आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “त्यांनी आमचा आणि मुलांचा विचार करायला हवा होता,” अशी भावना मोठा भाऊ गणेश बर्गे यांनी व्यक्त केली.

59
सातत्याने पैशांची मागणी

तक्रारीनुसार, गोविंद यांनी दिलेल्या पैशातून पूजाने आपल्या मावशीसह नातेवाईकांच्या नावावर प्लॉट खरेदी केला. एवढंच नाही, तर भावाच्या नावावर पाच एकर शेती करून देण्याची मागणीही केली जात होती.

69
घर नावावर न केल्यास गुन्ह्याची धमकी

कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, पूजाने गोविंदला थेट इशारा दिला होता – "गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्याविरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करीन." या धमकीमुळे गोविंद मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते.

79
टोकाचं पाऊल

या सततच्या दबावामुळे गोविंद यांनी सोमवारी मध्यरात्री टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी कारमध्येच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

89
पूजा गायकवाड कोण?

पूजा गायकवाड ही २१ वर्षांची नर्तकी असून तिचे स्वतःचे कलाकेंद्र आहे. तिच्या कलाकेंद्रात अनेकजण येत असतात. गोविंद जगन्नाथ बर्गे सातत्याने तिच्याकडे यायचे. यात दोघांचे प्रेम जडले होते.

99
पूजा आता संकटात?

ब्लॅकमेल करुन पैसे लाटल्याने पूजावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read more Photos on

Recommended Stories