दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; पत्नीसमोरच मारहाण, जुन्या वादातून मित्रानेच घेतला जीव

Published : Apr 14, 2026, 09:58 AM IST
madhya pradesh damoh brutal murder cannibalism case man kills teen with hammer drinks blood shocking crime india

सार

Dadar Crime : दादरमध्ये जुन्या वादातून अंकुश आंबोरकर यांची हत्या करण्यात आली. पत्नीसमोरच त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.

Dadar Crime : मुंबईतील दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका ४० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंकुश आंबोरकर यांना त्यांच्या पत्नीच्या देखत बेदम मारहाण करण्यात आली असून, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीसमोरच मारहाण, रुग्णालयात मृत घोषित

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अंकुश आंबोरकर आपल्या मित्राला भेटण्यासाठी दादरमध्ये गेले होते. त्यावेळी गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवून वाद घातला आणि बेदम मारहाण केली. ही माहिती मिळताच त्यांच्या पत्नीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जुन्या वादातून हत्येचा संशय

अंकुश आंबोरकर आणि गौरव सणस यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. दोघेही पूर्वी एकत्र बँजो व्यवसाय करत होते. मात्र, २०१७ पासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यातील वाद वाढत गेला. याच वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पूर्वीही दिल्या होत्या धमक्या

अंकुश यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, गौरव सणस हा सतत धमक्या देत असे आणि पूर्वीही मारहाण केल्याची तक्रार दादर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. तरीही वाद वाढत गेला आणि अखेर त्याचे रूप हत्येत झाले.

सहा आरोपी अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, घटनेमागील नेमका हेतू आणि पार्श्वभूमी तपासली जात आहे.

 

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू