
Dadar Station Platform Renumbers: मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन हे पश्चिम तसेच मध्य रेल्वे मार्गांना जोडले गेले आहे. या दोन्ही मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. बहुतांश प्रवाशांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्मच्या क्रमांकावरून गोंधळ होतो.
यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आता येत्या 9 डिसेंबर (2023) पासून लागू होणार आहे. अशातच मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मला नवे क्रमांक मिळणार आहेत. याशिवाय रेल्वेच्या कार्यप्रणालीत देखील काही बदल होणार आहेत.
दादर स्थानकात एकूण 15 प्लॅटफॉर्म आहेत. त्यापैकी सात हे पश्चिम रेल्वेचे आणि उर्रवरित आठ प्लॅटफॉर्म हे मध्य रेल्वेचे आहेत. आता नव्या प्लॅटफॉर्म क्रमांकानुसार पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला 1 ते 7 क्रमांक दिले जाणार आहेत. तर मध्य रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मला 8 ते 14 असे क्रमांक देण्यात आले आहेत.
दादर स्थानकातील मध्य रेल्वेवरील नवे प्लॅटफॉर्म क्रमांक
दादर रेल्वे स्थानकातून दररोज 50 हजारांच्या आसपास नागरिक प्रवास करतात. दादरवरून 226 फास्ट लोकल सुटतात. त्यापैकी 50 टक्के फास्ट लोकल कल्याणकडे जाणाऱ्या असतात. याशिवाय 25 लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून लांब पल्ल्याच्या ठिकाणासाठी चालवल्या जातात. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 मध्ये 240 स्लो लोकल चालवल्या जातात. दुसऱ्या बाजूला, पश्चिम रेल्वे मार्गावर 18 लोकल लांब पल्ल्यासाठी धावतात.
आणखी वाचा:
Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास