वांद्रे क्रोमा शोरुमला लागलेल्या आगीवरुन झिशान सिद्धिकींचा अग्निशमन दलावर संताप, म्हणाले... (Watch Video)

Published : Apr 29, 2025, 08:44 AM ISTUpdated : Apr 29, 2025, 10:48 AM IST
NCP leader Zeeshan Siddique

सार

Bandra Fire : वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोम शोरुमला भीषण आग लागल्याची घटना घडली. यावरुनच आता एनसीपी नेते झिशान सिद्धिकी यांनी अग्निशमन दलावर संताप व्यक्त केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Zeeshan Siddique on Bandra Fire : वांद्रे येथील क्रोमा शोरुमला भीषण आग लागल्याची घटना आज (29 एप्रिल) पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनी लागली. यानंतर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले. खरंतर, आग लेव्हल-III ची असल्याचे सांगण्यात आले. पण यावरुन आता एनपीसी नेते झिशान सिद्धिकी यांनी अग्निशमन दलावरच ताशेरे ओढल्याचे दिसून येत आहे.

झिशान सिद्धिकींची प्रतिक्रिया
झिशान सिद्धिकी यांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे आग लागली. नंतर काय रिपोर्ट येईल हे मला माहिती नाही. पण पहाटे 4 वाजल्यापासून मी आणि सामान्य नागरिक येथे आहोत. खरंतर, क्रोमाच्या बेसमेंटमध्ये लहान स्पार्क झाला होता. यानंतर आम्ही शंभरदा पाणी अजून मागवा अशी विनंती अग्निशमन दलाला करत होतो. याशिवाय अग्निशमन दलाकडे उपकरणे नव्हती किंवा होती तरीही त्यांना त्याचा वापर करता येत नव्हता. हे दुर्भाग्यपूर्ण आहे.” याशिवाय कर्मचाऱ्यांना व्यवस्थितीत ट्रेनिंग न दिल्याचा आरोपही झिशान यांनी केला आहे.

दरम्यान, आग लागल्यानंतर एकूण 12 अग्निशमन गाड्या, नऊ जंबो वॉटर टँकर, दोन श्वासोच्छ्वास उपकरणे असलेल्या व्हॅन, एक बचाव व्हॅन आणि एक क्विक रिस्पॉन्स वाहन तैनात करण्यात आले. 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा देखील स्टँडबायवर होती.आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

PREV

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा