CJP Protest : 'आंदोलनात सहभागी व्हाल तर ड्रग्ज प्रकरणात अडकवू', मुंबई पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा काँग्रेसचा आरोप

Published : Jul 23, 2026, 09:47 AM ISTUpdated : Jul 23, 2026, 12:59 PM IST
CJP Protest

सार

नीट पेपरफुटीवरुन करण्यात येणाऱ्या आंदोलनाला विरोधकांकडून पाठिंबा दिला जात आहे. अशातच काँग्रेसकडून आंदोलक विद्यार्थ्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : नीट पेपरफुटीवरुन सध्या देशभर आंदोलन तापले आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून गेल्या ३४ दिवसांपासून हे आंदोलन केले जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी देखील सहभाग घेतला आहे. या आंदोलनाचे पडसात महाराष्ट्रातही उमटले गेले. याच पार्श्वभूमीवर मुंबईतही आंदोलन झाले. यामध्ये मुंबई पोलिसांकडून विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्यावरुन धमकी दिली जात असल्याच आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.

काँग्रेसने काय म्हटले?

काँग्रेसच्या हाती मुंबईतील आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भातील एक व्हिडीओ हाती लागला आहे. या व्हिडीओवरुन काँग्रेसने असा आरोप केला आहे की, विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांकडून आंदोलनात सहभागी झाल्यास ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची भीती घातली जात आहे. याशिवाय मुंबई पोलीस कर्मचारी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना आंदोलनात दिसाल तर ५० ग्रॅमच्या पावडर टाकून गुन्हा दाखल करू असेही म्हणत आहे. यामुळे तुमचं आयुष्य वाया जाईल. जामीन मिळणार नाही. तुमच्यमुळे आम्हाला त्रास होतोय असेही तो पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना म्हणत असल्याचे काँग्रेसकडील व्हिडीओमध्ये म्हटले आहे. सदर व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही. 

 

 

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची प्रतिक्रिया


काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले की, या संदर्भात चौकशी व्हावी. देशात सध्या कशाप्रकारचे वातावरण हे आपण पाहात आहोत. देशभरातून जसे व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून येतायत ते बहुतांश खरे आहेत. दिल्लीत लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सला इलेक्ट्रिक शॉक बसत होते. याशिवाय प्रायव्हेट आर्मी होती ती कोणती होती, तिथे मुलांना मारण्यासाठी आणली होती का असा सवालही उपस्थिती केला. सध्या हा व्हिडओ कुठला आहे माहिती नाही. पण हे कुठल्या स्तरावर चालू आहे ते अत्यंत भयंकर आहे. विद्यर्थ्यांवर वेगवेगळ्या केसेस टाकून गुन्हे दाखल केले जात आहेत. हे थांबलले पाहिजे असेही सचिन सावंत यांनी म्हटले. दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याला शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून पाठिंबा दिला गेल्याची माहिती आहे.

दिल्लीतील आंदोलनाची सद्याची स्थिती


सीजेपीकडून (CJP) करण्यात आलेल्या आंदोलनाला विरोधकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी आंदोलनास्थळी भेट दिली. याशिवाय सध्याच्या स्थितीसाठी उभे राहण्यासाठी विरोधकांनी एकत्रित यावे अशी भूमिका मांडण्यात आली आहे.



दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक यांनी सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विचार करावा असे म्हटले आहे. याशिवाय आंदोलकांवर कोणतीही कारवाई करू नका. सरकारने आश्वासन दिले तर उपोषण सोडू असेही सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Dadar Shivaji Park CJP Protest : आंदोलकांनी भरलेली पोलिसांची व्हॅन भररस्त्यात थांबवली, सोशल मीडियावर चर्चा
विद्यार्थ्यांवरील लाठीमारावर संजय राऊत आक्रमक; 'राजा, तू बंदुकीची गोळी डाग...' म्हणत सरकारवर साधला निशाणा