CIDCO lottery Navi Mumbai: सिडकोची 'बंपर' लॉटरी! नवी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; फक्त २२ लाखांत घर, आजच करा अर्ज

Published : Mar 08, 2026, 04:12 PM IST

CIDCO lottery Navi Mumbai: सिडकोने नवी मुंबईतील खारघर आणि तळोजा येथे परवडणाऱ्या घरांची महालॉटरी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत केवळ २२.६ लाख रुपयांपासून घरे उपलब्ध असून, प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) २.५ लाखांच्या अनुदानाचा लाभही मिळणार आहे.

PREV
15
सिडकोची 'बंपर' लॉटरी! नवी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण

नवी मुंबई: नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने (CIDCO) सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची महालॉटरी जाहीर केली आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या खारघर आणि तळोजा सारख्या 'प्राईम लोकेशन'वर आता तुम्ही केवळ २२.६ लाख रुपयांपासून हक्काच्या घराचे मालक होऊ शकता. 

25
कुठे आहेत ही घरं?

सिडकोने हा भव्य प्रकल्प नवी मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी साकारला आहे.

खारघर पूर्व: सेक्टर २८, ३७ आणि ३९

तळोजा: विकसित होत असलेला हाय-टेक परिसर 

35
कनेक्टिव्हिटीचा 'सुपरफास्ट' तडका

या घरांच्या किमती जरी कमी असल्या, तरी सुविधा मात्र 'लक्झरी' आहेत. या प्रकल्पाच्या आसपास कनेक्टिव्हिटीचे जाळे विणले गेले आहे.

रेल्वे व मेट्रो: तळोजा पांचनंद रेल्वे स्टेशन आणि बेलापूर-पेंधर मेट्रो लाईन-१ अगदी हाकेच्या अंतरावर. भविष्यात मेट्रो लाईन १२ चाही लाभ मिळणार.

विमानतळ: प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने या भागाचे महत्त्व भविष्यात गगनाला भिडणार आहे.

सुविधा: परिसरात सुसज्ज रुग्णालये, नामांकित शाळा, उद्याने आणि प्रशस्त मोकळ्या जागांची उपलब्धता.

45
प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) लाभ

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २.५ लाख रुपयांपर्यंतचे सरकारी अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी हे घर अधिकच स्वस्त पडणार आहे.

महत्त्वाची तारीख: अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ मार्च २०२६ आहे. वेळ दवडू नका!

55
अर्ज कसा करायचा?

इच्छुक नागरिकांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर cidcohomes.com जाऊन आपली नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories