Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये पुन्हा प्रवाशावर हल्ला, विरार-चर्चगेट गाडीतील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

Published : Jul 16, 2026, 09:10 AM ISTUpdated : Jul 16, 2026, 09:16 AM IST
Mumbai Local Fight

सार

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर हल्ले करण्याच्या घटनांंमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अलीकडे नालासोपारा लोकलमधील घटना समोर आली होती. यानंतर आता पुन्हा सोशल मीडियात प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई : मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये चढण्याउतरण्यावरुन वाद होतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण प्रवाशांवर हल्ला होत असल्याच्या घटनांमध्ये सध्या वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नालासोपारा लोकलमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा लोकलमधील वादाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

नक्की काय घडले?

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-विरार लोकलमधील सदर घटना आहे. गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये उभे राहण्याच्या जागेवरून वाद सुरू झाला होता. हा वाद ऐवढा चिघळला गेला की, त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत अद्याप रेल्वे पोलीस किंवा पश्चिम रेल्वेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हिडीओमध्ये दोन-तीन जणांमध्ये वाद झाल्याचे दिसतेय.   

अधिकृत माहितीची प्रतीक्षा

हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, कोणत्या लोकलमधील आहे हे समोर आलेले नाही. याशिवाय याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुंबईहून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्येही हल्ला

मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मध्यरात्री प्रवाशावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. लगेच कोचमध्ये दोन व्यक्तींमध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोन जणांच्या डोक्याला दुखापत झालीय. कल्याण स्थानकावरील आरपीएफ आणि जीआरपी यांनी सदर घटनेची दखल घेतली.

दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले. एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले की, हाणामारी झाली तेव्हा कोणाकडेही धारधार शस्र नव्हते.

 

 

मुंबई लोकलमधील वादांच्या घटना 

गेल्या काही दिवसांपूर्वीच चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये झालेल्या वादातून एका प्रवाशाची चाकूने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर टीसी आणि प्रवाशामध्ये मराठी भाषा बोलण्यावरुन वाद झाला होता. याचाही व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. 

 

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा, व्हिडिओ तुफान व्हायरल
Mumbai Airport T1: मुंबई एअरपोर्टच्या T1 च्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा