Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपद गेलं, पुन्हा परतले; देवेंद्र फडणवीस यांची संयमी मुख्यमंत्री होण्याची कहाणी

Published : Jul 15, 2026, 07:33 PM IST
Devendra Fadnavis

सार

Maharashtra CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वाधिक मुख्यमंत्रिपद भूषवणारे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचा संयमीपणा त्यांच्या राजकीय प्रवासात महत्त्वाचा ठरला आहे.

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करणाऱ्यांनी द्वेष निश्चितच करावा, विरोधक म्हणून ते त्यांच्या जागी योग्य आहेत, पण ते महाराष्ट्राला मिळालेले संयमी मुख्यमंत्री का आहेत, हे नक्कीच वाचा. देवेंद्र फडणवीस यांनी चुका केल्या, आणि त्यांनी त्या मान्य केल्या नाहीत, असंही झालं नाही. पण देवेंद्र फडणवीस हे चुकांमधून नक्कीच शिकत गेले. म्हणूनच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही टिकून आहेत.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे क्रमांक ३ चे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भोगणारे मुख्यमंत्री ठरलेत. राजकारणात देवेंद्र फडणवीस सत्ताधारींना आवडतील, पण विरोधकांना आवडणार नाहीत हे नक्की. देवेंद्र फडणवीस यांना संयमी म्हणण्याचं कारणंही तसंच आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं जातंय, असं अनेकांना वाटू शकतं. पण भुतकाळातला आरसा पाहा, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला उरुन पुरुन निघालेत.

देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली, ती राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती केली तेव्हा. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी - शरद पवारांसोबत जातील असं वाटलं नव्हतं, हे त्यांनी मान्य केलं, अर्थातच चूक मान्य केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा काही पहिलाच धक्का नव्हता. कारण शिवसेनेचे आमदार फुटून सुरत-गुवाहाटीला गेले, पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.

हीच देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाची खरी परीक्षा होती. देवेंद्र फडणवीस यांना आपलं डिमोशन होतंय, असं वाटलं असतं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारलं असतं, तर ते आज पुन्हा मुख्यमंत्रीपदावर कधीच येऊ शकले नसते आणि त्यांची आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक ठरली असती. पण मागची एक चूक किती महागात पडली, यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी विचार करुन उपमुख्यमंत्रीपद अडीच वर्ष संयमासह स्वीकारलं. अजित पवार यांना महायुतीत जोडलं.

यानंतर देवेंद्र फणडवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी आले. मराठा आंदोलनासारखा कठीण वाटणारा विषय देखील संयमाने हाताळला. मराठा समाजाचा विश्वास जिंकण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्याच बरोबर वरचढ ठरणाऱ्या नेत्यांनाही धडा शिकवायला कमी पडले नाहीत. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले फडणवीस, आणि दुसऱ्यांदा पदावर आलेले फडणवीस अधिक कणखर दिसले. अजितदादा, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना सोबत घेऊन राज्याचा कारभार चालू ठेवला, हे तेच करु शकले.

ज्या प्रमाणे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार बनवून, सांभाळून घेणारा नेता उद्धव ठाकरेच आहेत, असं शरद पवार यांना वाटतं होतं. तसंच कदाचित अमित शहा यांनाही आता एकनाथ शिंदे, अजित पवार- राष्ट्रवादी म्हणजेच सुनेत्रा वहिनी, हे कॉम्बिनेशन घेऊन सरकार चालवणारे देवेंद्रच आहेत, हे वाटत असावं.

देवेंद्र यांना केंद्रात पाठवत आहेत, अशा वावड्या अनेक वेळा उठतात, पण त्यामागे काही पक्षातले, काही बाहेरचे असावेत. पण आज तरी तीन पक्षांचं सरकार चालणवणारा नेता देवेंद्र फणडवीस यांच्याशिवाय कुणीच नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस हे यशवंतराव चव्हाण, शरद पवार यासारख्या मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्यांएवढेच महाराष्ट्राला महत्त्वाचे वाटतील, अखेर द्वेषातून देवेंद्र फुलला असंच म्हणावं लागेल.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा, व्हिडिओ तुफान व्हायरल
Mumbai Airport T1: मुंबई एअरपोर्टच्या T1 च्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा