चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पहिला लूक आला समोर, 'असा' दिसतोय बाप्पा

Published : Aug 31, 2024, 06:08 PM ISTUpdated : Aug 31, 2024, 06:20 PM IST
Chinchpokli Chintamani

सार

मुंबईतील तरुणाईचं खास आकर्षण असलेल्या 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा आज शनिवारी 31 ऑगस्टला आगमन सोहळा पार पडत आहे. आता 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ची सुंदर मुर्ती पाहायला मिळत आहे.

Chinchpokli Chintamani 2024 : गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया हा जयघोष आता हळूहळू कानावर पडू लागला आहे. गणोशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वत्रच लाडक्या बाप्पााच्या आगमनाची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मंडळातील गणपती बाप्पाच्या आगमन सोहळे मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. मात्र त्यापूर्वीच तयारी, सजावट यासाठी गणेशोत्सव मंडळ लाडक्या बाप्पाला काही दिवस आधीच मंडपात विराजमान करतात.

मुंबईतील तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा आज शनिवारी 31 ऑगस्टला आगमन सोहळा पार पडत आहे. आता 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ची सुंदर मुर्ती पाहायला मिळत आहे. यात बाप्पाला चिंतामणी रंगाचे धोतर नेसवलेले दिसत असून, त्यावर निळ्या रंगाचा शेला पाहायला मिळत आहे. त्यासोबत गणपती बाप्पाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, सोन्या-चांदीचे दागिनेही परिधान केले आहेत. विशेष म्हणजे यंदा 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'च्या प्रभावळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंचपोकळीतील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखले जाते. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 105 वे वर्ष आहे. 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'च्या आगमनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या लालबाग, परळ, चिंचपोकळीतील रस्त्यांवर मोठ्या संख्येने तरुणाई आगमन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जमा झाली आहे. चिंतामणीचा बाप्पा हा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच मोठ्या थाटात हा आगमन सोहळा पार पडत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा :

Ganesh Chaturthi 2024 : शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ घ्या जाणून

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!