
मुंबई: रविवार म्हणजे विश्रांतीचा दिवस, पण मुंबई लोकल प्रवाशांसाठी मात्र तो अनेकदा धावपळीचा ठरतो. यंदाही 22 जून, रविवार रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर नियोजित मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळात लोकलसेवा मर्यादित राहणार असल्यामुळे प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असून, प्रवाशांनी योजना करून लवकर प्रवास सुरू करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ब्लॉक वेळ: सकाळी 11.05 ते दुपारी 3.55
प्रभावित मार्ग: माटुंगा ते मुलुंड (अप आणि डाऊन धिम्या मार्ग)
सीएसएमटीहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 दरम्यान सुटणाऱ्या लोकल फेऱ्या माटुंगा-मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील.
या लोकल फेऱ्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाण्याहून सकाळी 11.07 ते दुपारी 3.51 दरम्यान सुटणाऱ्या लोकल्स देखील उलट दिशेने जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या देखील उशिरा धावतील.
हार्बर मार्ग : मानखुर्द ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक
ब्लॉक वेळ: सकाळी 11.15 ते दुपारी 4.15
सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या लोकल्स (10.18 ते 3.28)
आणि
पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल्स (10.37 ते 3.45)
रद्द राहणार.
या दरम्यान प्रवाशांसाठी विशेष लोकल सेवा CSMT-मानखुर्द आणि पनवेल-नेरुळ/ठाणे मार्गांवर चालवण्यात येणार आहे.
प्रवाशांना ट्रान्स-हार्बर लाईन व मेन लाईनचा पर्याय वापरण्याची मुभा असेल (सकाळी 10 ते दुपारी 4.30 पर्यंत).
पश्चिम रेल्वे : यंदा ‘डे ब्लॉक’ नाही, पण शनिवारी ‘नाईट ब्लॉक’
अप जलद मार्गावर: रात्री 11.15 ते 2.45
डाऊन जलद मार्गावर: रात्री 12.45 ते 4.15
या काळात विरार/वसई रोड – बोरीवली दरम्यानच्या जलद मार्गावरील लोकल्स धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
काही लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता असून, प्रवाशांनी संबंधित स्थानकांवरून अधिक माहिती घ्यावी.
रविवारी प्रवास करणार्या मुंबईकरांनी ब्लॉक वेळांची नोंद ठेवावी, शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि अडथळ्यांपासून बचाव करण्यासाठी प्रवास लवकर सुरू करावा. रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक दुरुस्ती आणि सुरक्षा दृष्टीने हे ब्लॉक्स अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.