Ganeshotsav 2026 : मुंबईत गणेश मंडळांसाठी BMCचा मोठा निर्णय; मंडप परवानगी आणि NOC आता ऑनलाइन काढता येणार

Published : Aug 14, 2026, 06:24 PM IST
Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal

सार

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई महापालिकेने ऑनलाइन सिंगल-विंडो प्रणाली सुरू केली आहे. मंडप परवानगी तसेच पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे NOC ऑनलाइन मिळवता येणार आहे.

मुंबई : मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांसाठी महापालिकेने मोठी सुविधा सुरू केली आहे. मंडप उभारणीची परवानगी आणि स्थानिक तसेच वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन सिंगल-विंडोची सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे. देशभरात येत्या यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर मंडपांसाठी परवानगी 26 सप्टेंबरपर्यंत वॅलिड राहणार आहे.

मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना BMCच्या वेबसाइटवरील ‘For Citizens - Pandal (Public Ganeshotsav/Navratri Festival/Other Festivals)’ या सुविधेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.अर्जाची प्रथम संबंधित विभागीय कार्यालयाकडून व्हेरिफिकेशन केले जाईल. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून आवश्यक NOC ऑनलाइन मिळवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

नवीन मंडळांसाठी काय नियम?

सार्वजनिक किंवा खासगी जागेवर पहिल्यांदाच मंडप उभारण्यासाठी परवानगी घेणाऱ्या नवीन मंडळांचा अर्ज पुढील मंजुरीसाठी विभागीय उपआयुक्तांकडे पाठवला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर मंडळाला 100 रुपयांचा शुल्क भरावा लागेल. त्यानंतर संबंधित विभागीय कार्यालयाकडून मंडप उभारणीची परवानगी दिली जाईल.

जुन्या मंडळांसाठीही ऑनलाइन रिन्यू करावे लागणार

आधीच पाच वर्षांची परवानगी असलेल्या गणेश मंडळांसाठी महापालिकेने ऑनलाइन रिन्यू करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या मंडळांच्या मंडपाच्या जागेची संबंधित विभागीय कार्यालयाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. मंजूर परवानगीतील जागा आणि क्षेत्रफळाशी प्रत्यक्ष स्थिती जुळते का, याची तपासणी केल्यानंतरच पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे NOC घेण्याची प्रक्रिया केली जाईल.

2025 मध्ये एक वर्षाची परवानगी घेतली असेल तर...

ज्या मंडळांनी 2025 मध्ये केवळ एक वर्षाची परवानगी घेतली होती त्यांना यंदा एका वर्षाची (2026) किंवा पाच वर्षांची (2026-30) परवानगी घेण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

प्रत्येक मंडळातील दोन स्वयंसेवकांना प्रशिक्षण बंधनकारक

मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्त्वाचा नियमही लागू केला आहे. प्रत्येक मंडळातील किमान दोन स्वयंसेवकांना एक दिवसीय प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात गर्दीचे व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, प्रथमोपचार यासह इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली जाणार आहे.

रस्ते आणि फुटपाथ खोदल्यास कारवाई

गणेश मंडप उभारण्यासाठी रस्ते किंवा फुटपाथवर खड्डे खोदण्यास महापालिकेने स्पष्टपणे मनाई केली आहे. मंडप उभारण्यासाठी रस्ते किंवा फुटपाथचे खोदकाम न करता पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन महापालिकेने मंडळांना केले आहे.मंडप उभारण्यासाठी रस्ता किंवा फुटपाथ खोदल्याचे आढळल्यास संबंधित मंडळावर कारवाई केली जाणार असल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अग्निसुरक्षा आणि आरोग्य नियमांचे पालन आवश्यक

गणेश मंडळांना अग्निसुरक्षेच्या नियमांसह आवश्यक परवाने, जाहिरातविषयक नियम आणि सरकारने जारी केलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी लागू असलेल्या आरोग्यविषयक नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू