BMC मेगा भरती 2026: मुंबई पालिकेत नोकरीचा महाकुंभ! 56,000 रिक्त पदे, 9,000 जागांसाठी प्रक्रिया सुसाट

Published : Mar 02, 2026, 04:03 PM IST

Mumbai Municipal Corporation recruitment: मुंबई महानगरपालिकेत (BMC) तब्बल 56,126 पदे रिक्त असून, प्रशासनाने ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या 9,295 पदांची भरती युद्धपातळीवर सुरू झाली आहे.

PREV
14
मुंबई पालिकेत नोकरीचा महाकुंभ!

मुंबई : स्वप्नांच्या शहरात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मुंबई महानगरपालिकेत (BMC) सध्या रिक्त पदांचा मोठा डोंगर असून, प्रशासनाने आता ही पदे भरण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल 56,126 पदे रिक्त असल्याची आकडेवारी समोर आली असून, त्यापैकी 9,295 पदांची भरती प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

24
रिक्त पदांचे गणित, एका नजरेत

मुंबई पालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी मंजूर पदांची संख्या मोठी असली, तरी प्रत्यक्षात रिक्त जागांमुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.

एकूण मंजूर पदे: 1,45,256

सध्या कार्यरत कर्मचारी: 89,130

एकूण रिक्त पदे: 56,126

सध्या सुरू असलेली भरती: 9,295 पदे

34
भरती प्रक्रियेचा वेग वाढला!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 70 हजार पदांच्या मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर, मुंबई पालिकेनेही आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार:

5,486 पदांची निवड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.

उर्वरित 3,809 जागांसाठी सध्या कार्यवाही सुरू आहे.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे ही प्रक्रिया अधिक वेगवान करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सुशिक्षित बेरोजगारांना लवकर न्याय मिळेल.

44
प्रशासनापुढील पेच, सेवा की खर्च?

एकीकडे रिक्त पदे भरून नागरी सेवा दर्जेदार करण्याचा पालिकेचा मानस आहे, तर दुसरीकडे वाढता महसुली खर्च कमी करण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात काही पदे कमी करण्याचे संकेत दिले असले, तरी 'अत्यावश्यक सेवां'साठी ही मेगा भरती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेत करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी 2026 हे वर्ष संधींचे वर्ष ठरणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories