
BMC Elections 2025 : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा (Municipal Corporation Election 2025) फॉर्म्युला अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूर महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन मैदानात उतरतील. या शहरांमध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद आणि शिंदे गटाचा स्थानिक पातळीवरील प्रभाव लक्षात घेऊन समान समीकरण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाची ताकद जवळपास समसमान असल्यामुळे वेगळी रणनीती स्वीकारण्यात आली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांत नाराजी वाढू नये, उमेदवारांमध्ये बंडाळी टाळावी आणि संघटनात्मक रचना बळकट रहावी यासाठी या दोन शहरांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत.नागपूरमध्ये भाजपाची ताकद अधिक असूनही मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेतले जाईल. नवी मुंबई महापालिकेसाठी मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाही, पण BJP–शिंदे गट एकत्र लढण्याची शक्यता मजबूत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपा नवीन पॅटर्न लागू करण्याच्या तयारीत आहे. नगरपरिषद निवडणुकांत अनेक ठिकाणी आमदार, खासदार आणि प्रभारी मंडळींकडून मनमानी पद्धतीने उमेदवार ठरवल्याच्या तक्रारी आल्या. यामुळे 2025 साठी अधिक काटेकोर, संगठित आणि पारदर्शक यंत्रणा आणण्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.
भाजपाकडून: