मुंबईच्या महापौर पदावरुन भाजप-शिवसेनेची काल रात्री दिल्लीत खलबते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Published : Jan 21, 2026, 08:10 AM IST
BJP Mumbai President Amit Satam meets Shiv Sena leader Rahul Shewale

सार

BJP Mumbai President Amit Satam meets Shiv Sena leader Rahul Shewale : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीवरून भाजप आणि शिंदे गटात दिल्लीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 

BJP Mumbai President Amit Satam meets Shiv Sena leader Rahul Shewale : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सत्ता समीकरणांबाबत आणि महापौर पदाच्या निवडीबाबत आता दिल्लीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय खलबते आणि दिल्लीवारी

खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अमित साटम दाखल झाले असून, दोघांमध्ये महापालिकेच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेवर कोणाचे वर्चस्व राहणार आणि महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, यावर या बैठकीत रणनीती आखली गेल्याचे समजते.

संजय राऊत यांचा हल्लाबोल

दुसरीकडे, या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. खासदार संजय राऊत यांनी आधीच आरोप केला होता की, "मुंबईचा महापौर आता मुंबईत नव्हे, तर दिल्लीत ठरवला जात आहे." मुंबईचा स्वाभिमान दिल्लीच्या वेशीवर टांगला जात असल्याची टीका ठाकरे गटाकडून सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपची आक्रमक भूमिका

महापौर पदाबाबत भाजपने आपली भूमिका अधिक स्पष्ट आणि आक्रमक केली आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की:

  • मुंबईचा महापौर भाजपचाच होईल.
  • या पदाबाबत कोणतीही तडजोड (Compromise) केली जाणार नाही.
  • या स्पष्ट भूमिकेमुळे महायुतीमधील अंतर्गत समीकरणे कशी राहतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुका आणि महापौर पदाचा पेच सोडवण्यासाठी आता थेट दिल्ली दरबारी सूत्रे हलत आहेत. भाजपच्या 'नो तडजोड' धोरणामुळे ही लढाई अधिक रंजक होण्याची चिन्हे असून, आगामी काळात मुंबईच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai : संपूर्ण मुंब्राचा रंग हिरवा करणार”, MIM पक्षाची नगरसेविका सहर शेखच्या विधानाने खळबळ, राजकरण तापले
Kalyan Dombivli Election 2026 : कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी सत्तासंघर्ष, नगरसेवक फोडाफोडीने राजकारण तापले