August 2025 Bank Holiday List : स्वतंत्र्यदिन, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी आणि जनमाष्टमीसह एकूण 15 सुट्ट्या

Published : Jul 30, 2025, 03:32 PM IST
Bank holidays

सार

यंदा ऑगस्ट महिन्यात देशभरात एकूण १५ बँक सुट्ट्या असतील. यामध्ये स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, जनमाष्टमी यांसारख्या सणांसह प्रादेशिक सण व दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारी होणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमिवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जाहीर केलेल्या ऑगस्ट 2025 च्या अधिकृत बँक सुट्टीच्या यादीवर एक नजर टाकणे महत्त्वाचे ठरेल. यंदा ऑगस्ट महिन्यात देशभरात एकूण १५ दिवस सुट्ट्या असतील. यामध्ये स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, जनमाष्टमी यांसारख्या सणांसह प्रादेशिक सण व दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारी राहणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक बँक सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक :

३ ऑगस्ट (रविवार) : सर्व भारतभर बँका बंद, साप्ताहिक सुट्टी.

८ ऑगस्ट (शुक्रवार) : सिक्कीम (गंगटोक) येथे Tendong Lho Rum Faat निमित्त बँकांना सुट्टी.

९ ऑगस्ट (शनिवार) : दुसरा शनिवार म्हणून सर्वत्र सुट्टी. तसेच रक्षाबंधन व झुलान पूर्णिमा निमित्त अहमदाबाद, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, जयपूर, कानपूर, लखनऊ, शिमला येथे सुट्टी.

१० ऑगस्ट (रविवार) : रविवारी सर्व बँका बंद.

१३ ऑगस्ट (बुधवार) : मणिपूर (इंफाळ) मध्ये देशभक्त दिन (Patriot’s Day) निमित्त बँका बंद.

१५ ऑगस्ट (शुक्रवार) : स्वातंत्र्य दिन, पारसी नववर्ष (शहंशाही) व जनमाष्टमी साजरी होणार, संपूर्ण भारतात बँका बंद.

१६ ऑगस्ट (शनिवार) : जनमाष्टमी / कृष्ण जन्माष्टमी निमित्त खालील शहरांमध्ये बँका बंद : अहमदाबाद, आयझॉल, भोपाळ, रांची, चंदीगड, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पटना, रायपूर, शिलाँग, जम्मू, श्रीनगर, विजयवाडा.

१७ ऑगस्ट (रविवार) : सर्वत्र रविवारी सुट्टी.

१९ ऑगस्ट (मंगळवार) : त्रिपुरा (अगरतळा) येथे महाराज बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद.

२३ ऑगस्ट (शनिवार) : चौथा शनिवार, संपूर्ण भारतात बँका बंद.

२४ ऑगस्ट (रविवार) : रविवारी साप्ताहिक सुट्टी.

२५ ऑगस्ट (सोमवार) : गुवाहाटी (आसाम) येथे श्रीमंत शंकरदेव तिरोभाव दिन निमित्त बँका बंद.

२७ ऑगस्ट (बुधवार) : गणेश चतुर्थी, संवत्सरी, विनायक चतुर्थी निमित्त अहमदाबाद, मुंबई, नागपूर, बेलापूर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पणजी, विजयवाडा येथे बँका बंद.

२८ ऑगस्ट (गुरुवार) : गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आणि नुआखाई निमित्त भुवनेश्वर आणि पणजी येथे बँका बंद.

३१ ऑगस्ट (रविवार) : महिन्याचा शेवटचा रविवार, सर्व बँका बंद.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Dhirubhai Ambani International School : जगात टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय शाळा, मुंबईतील शाळेची फी किती?
Marco Rubio In India : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारतात; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट