
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मुंबई पोलिसांनी पॉर्न व्हिडीओ शूट करणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे. जोडप्याचं दीपंकर आणि त्याची पत्नी रश्मी उर्फ बंटी आणि बबली असं नाव सांगण्यात आले आहेत. मुंबई - अहमदाबाद मार्गावरील पाली व्हिलेज रिसॉर्ट येथे हे शूट करण्यात आलं होतं.
अपलोड व्हिडीओ हा २०२४ मध्ये इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता. २३ जून २०२५ रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. २३ जून रोजी अज्ञात आरोपीने दिलेल्या माहितीनुसार अज्ञात जोडप्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात पती पत्नीच्या नावाची माहिती समजल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले पाली व्हिलेज रिसॉर्ट हे एका माही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मालकीचे आहे. त्याचा वापर अशा गैरकृत्यांसाठी कसा करण्यात आला याचा छडा लावला जाणार आहे. या जोडप्याच्या विरोधात अशा प्रकारचे गुन्हे आधी दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील पोलीस तपासात या सर्व प्रकरणाचा तपास लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.